शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम पिढी तयार करा

By admin | Updated: January 18, 2017 01:28 IST

आजची बालके देशाचे भवितव्य आहेत. शिक्षणाबरोबरच मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे,

उषा मेंढे : स्पर्धात्मक एकमंच सांस्कृतिक कार्यक्रम साखरीटोला : आजची बालके देशाचे भवितव्य आहेत. शिक्षणाबरोबरच मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे, तेव्हाच देशात संस्कारक्षम पिढी तयार होईल व भारताचे भवितव्य उज्वल होईल, असे विचार जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केले. त्या साखरीपाठ बाबा मंदिरात मकरसंक्राती उत्सव मेळावा व शालेय स्पर्धात्मक एकमंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. साखरीपाठ बाबा सेवा समितीच्या वतीने दोन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य लता दोनोडे यांच्या हस्ते, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दीप प्रज्वलन जि.प. सदस्य दुर्गा तिराले, नगरसेवक यादवराव पंचमवार यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून सरपंच संगीता कुसराम, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चाटे, डॉ. देशमुख, देवराम चुटे, प्राचार्य सागर काटेखाये, समितीचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका अजया कठाणे, प्रा. दखने, प्रा. भदाडे, श्यामलाल दोनोडे उपस्थित होते. या वेळी बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमात श्री विद्या गर्ल्स हायस्कूल, बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळा, शांती निकेतन कॉन्व्हेंट, सक्सेस पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. दुसऱ्या दिवशी हळदीकुंकू, घोड्यांची शोभायात्रा, होमहवन, तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी माजी पं.स. सदस्य संगीता शहारे, बक्षीस वितरक म्हणून आ. संजय पुराम, सभापती हिरालाल फाफनवाडे, रमेश चुटे, वसुली अधिकारी शरद बावनथडे, सुनील अग्रवाल, डॉ. चाटे, मदनलाल अग्रवाल, शामलाल दोनोडे, मुकेश नागेंद्र, ललीत अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, संतोष बोहरे, प्रदीप चुटे, संदीप अग्रवाल, मनोज अग्रवाल, मुख्याध्यापिका डी.एफ. बघेले, संतोष उईके, प्रजापती, गोविंद बागडे उपस्थित होते. यावेळी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व वस्तूच्या रुपात बक्षीस देण्यात आले. मंदिरात भक्तांना बसण्याकरिता एक चावडी तसेच रस्त्याचे बांधकाम आमदार निधीतून करण्याची हमी आ. संजय पुराम यांनी दिली. प्रास्ताविक संतोष अग्रवाल यांनी मांडले. संचालन प्राचार्य सागर काटेखाये यांनी केले. आभार प्रा. सुनील वाघमारे यांनी मानले.(वार्ताहर)