शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विदेशी दारू तयार करताना पकडले

By admin | Updated: April 9, 2017 00:07 IST

स्पिरीटपासून बनावट विदेशी मद्य तयार करून ते विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरताना एका इसमाला

एकाला अटक : कारूटोला येथील कारवाई गोंदिया : स्पिरीटपासून बनावट विदेशी मद्य तयार करून ते विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरताना एका इसमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गोंदिया तालुक्यातील कारूटोला येथे करण्यात आली. यात त्या इसमाला अटक केली असून त्याच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, कारूटोला येथे बनावट विदेशी मद्य बनविल्या जात असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर गोंदिया ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक बी.जी. भगत यांनी सकाळी ७ वाजता आपल्या सहकाऱ्यांसह कारूटोल्यातील आरोपी सिंधनरेश माणिकचंद बिसेन (३७) याच्या घरी धाड घातली. यावेळी तो स्पिरीटच्या मदतीने बनावट विदेशी दारू तयार करताना आढळला. ती बनावट दारू ‘ओ.सी.ब्लू’ या बँ्रडच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री केली जाणार होती. पथकाने त्या ठिकाणावरून १८० मिली क्षमतेच्या ओसी ब्लू कंपनीच्या बनावट विदेशी मद्याच्या ३५ बाटल्या, इंपेरियल ब्लू ब्रँडच्या बनावट मद्याच्या १८० क्षमतेच्या १८ बाटल्या, एका २० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये १० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरिट), तसेच १८० मिलीच्या ४९ रिकाम्या बाटल्या आणि बॉटलिंगकरिता वापरण्यात येणारे बनावट बुच असा एकूण ९ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला. या आरोपीने बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिट व बॉटलिंगसाठी साहित्य, बुच कुठून आणले याचा सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दु.निरीक्षक भगत, सहायक दु.निरीक्षक हुमे, जवान पागोटे, उईके व वाहनचालक मडावी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)