शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करण्याची माणणी

By admin | Updated: December 29, 2014 23:46 IST

क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण

गोंदिया : क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमात न येता शिक्षकांनी आलेल्या मान्यवरांना वाट पहायला लावून स्वदेशी क्रीडा मंडळाला तमाचा मारला, असा आरोप करून त्यात दोषी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी रतन वासनिक यांनी केली आहे.स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदिया अंतर्गत आसोली केंद्र क्रीडा संमेलन जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरवाही (पं.स. गोंदिया) येथे २१ ते २४ डिसेंबर २०१४ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. यात १३ ग्रामपंचायतींचे सर्वच पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. आपापल्या शाळांना व विद्यार्थ्यांना क्रमांक मिळेल अशी आशा पल्लवित करू पाहत होते. तसेच आपआपसात आपापल्या गावच्या शाळांच्या विजयाची बाजी लावून घोषणाबाजी करीत होते. मात्र २१ डिसेंबरला उद्घाटन समारंभ पार पडून क्रीडोत्सवाला सुरूवात झाली व शिक्षकांनी आपआपसात संगनमत करून हा उत्सव निधनोत्सव कसा ठरेल, याची व्युहरचना केल्याच्या आरोप रतन वासनिक यांनी केला आहे. याचे कारण म्हणजे या उत्सवाची सांगता २४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभाने होणार होती. ठरल्यानुसार सर्व पाहुणे मंडळी संमेलनाच्या मंडपात पोहचले होते. परंतु त्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी एकही शिक्षक उपस्थित नव्हता. तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की, शिक्षकवृंद शाळेच्या खोलीत बसून कोणत्या शाळेच्या खो-खो व कबड्डी चमूला अंतिम विजयी करून प्रथम व द्वितीय पुरस्कार द्यावे, याबाबत चर्चा करण्यात रंगले होते. ही बाब समजल्यावर पंचायत समिती सदस्य रामू चुटे यांनी केंद्रप्रमुख वैद्य यांना फोन केल्यावर ते बाहेर आले व विनंती करू लागले की आपआपसात सर्व शिक्षकांनी चर्चा केली व त्यानुसार बक्षीस वितरण करा. यावर गावकरी, सर्व पदाधिकारी, नेते व पाहुणे बावरले. शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी बरईकर यांच्याशी फोनवर संपर्क करून घटनेचे गांभीर्य सांगितले व सर्वच दोषी शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करावे, अशी मागणी केली.विशेष म्हणजे सदर क्रीडा संमेलन पार पाडण्यासाठी पंचायत समिती गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रान्वये प्राप्त सूचनांचे सर्वच शाळांनी पालन करावे, असे स्पष्ट आदेश आहे. तरीसुद्धा जि.प. च्या शिक्षकांनी असे का केले, हे कळण्यापलीकडे आहे. त्या दिवसापर्यंत सेमी फायनल व फायनल शेवटच्या तारखेपर्यंत न ठरविल्याने व बक्षीस वितरण समारंभाची सुरूवात न करून स्वदेशी क्रीडा मंडळाला तमाचा मारला.यात दोषी असलेल्या सर्व शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी १३ गावांचे सरपंच, बक्षीस वितरणासाठी आलेले पाहुणे, जि.प. सदस्य रामू चुटे, पं.स. सदस्य सुरेश कावळे, सरपंच रवी हेमने, मेंढे, इतर गावातील सरपंच व गणमान्य नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. (प्रतिनिधी)