शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हादरलेले गाव अखेर सावरले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST

विजय मानकर सालेकसा : टायफाॅइड झाल्याचा समज ठेवून कोविडची चाचणी न करता बिनधास्त वावरणाऱ्या लोकांना कोरोनाने आपल्या जबड्यात पकडले. ...

विजय मानकर

सालेकसा : टायफाॅइड झाल्याचा समज ठेवून कोविडची चाचणी न करता बिनधास्त वावरणाऱ्या लोकांना कोरोनाने आपल्या जबड्यात पकडले. पाहता-पाहता संपूर्ण गावच कोरोना बाधित झाले. परंतु प्रशासनाची दक्षता आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमांमुळे कोरोनाने हादरलेले गाव अखेर सावरले. आता या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या गावाचे नाव ब्राम्हणटोला हे आहे.

सालेकसा तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणटोला गाव म्हणजे शंभर टक्के शेती आणि शेती पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. या गावात लॉकडाऊन काळात लोक बिनधास्त घराबाहेर निघून आपली दिनचर्या सुरु ठेवून होते. पाहता-पाहता गावात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीला लोक सामान्य आजार समजून फारसे लक्ष न देता तापाची औषध घेऊन मोकळे होऊ लागले. दरम्यान पाहता-पाहता गावभर तापाचे थैमान सुरु झाले. जवळपास ३० कुटुंबांची वस्ती असलेल्या गावात घरा-घरात तापाचे रुग्ण आढळून लागले. काही लोकांनी खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला. परंतु तापाचे प्रमाण वाढतच चालले. अवघ्या १५ दिवसापूर्वी सुरु झालेल्या तापाच्या संक्रमणात गावातील चार-पाच लोकांना मृत्यूने कवटाळले. यामुळे संपूर्ण गाव हादरले. ही बाब प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली. सरपंच बद्रीप्रसाद दसरिया यांच्या पुढाकाराने सर्वप्रथम गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. व गावाला चारही बाजूने सील करण्यात आले. त्यानंतर कोरोनाची नमुना चाचणीची मोहीम सुरु करण्यात आली. गावातील लोकांना आरोग्य केंद्रात पाठविण्याऐवजी आरोग्य चमू गावात बोलावून गावाच्या शाळेत कोरोना चाचणी सुरु करण्यात आली. दरम्यान गाव सील झाल्याने लोकांनी दैनंदिनी कामे खोळंबली. त्यामुळे रस्ते खुले करा म्हणून सरपंच दसरिया यांच्या घरासमोर शेकडो लोक निदर्शने ही करु लागली. त्यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.

....

गावात लावले आरोग्य शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू रघराटे आणि डॉ. अली यांच्या मार्गदर्शनात सतत दहा दिवस येथील आरोग्य सेविका सासरवाडे व त्यांचे सहकारी आणि आरोग्य सहायक यांनी चाचणी शिबिर लावून संपूर्ण गावाची कोरोना चाचणी केली. एक आठवडापर्यंत या गावात दररोज सहा-सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघू लागले. त्यांना लगेच कोरोनाचा औषधोपचार देण्यात आला.

.....

कोरोना चाचण्यांवर दिला भर

ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत इतर चारही गावात सुद्धा फवारणी करण्यात आली. गावातील काही लोक छुप्या मार्गाने खासगी डॉक्टरांकडे जाणे सुरु केले. परंतु गावची परिस्थती बघून त्या खासगी डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास लावले व योग्य औषधोपचार दिला. याचा सुद्धा लाभ झाला. सतत एक आठवडा कोविड टेस्ट आणि लगेच औषधोपचार यामुळे अखेर गावात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला. मागील दोन दिवसापासून गावात एक ही कोरोना रुग्ण सापडला नाही.

.........

पंधरा दिवसासाठी गाव केले होते सील

पंधरा दिवसासाठी गावाला सील करण्यात आले असता २० मे ला कालावधी पूर्ण होत असून काही बाबतीत सावधता ठेवून गावातील लोकांना कोरोना नियमाचे पालन करीत गावाबाहेर जाण्या-येण्यासाठी मुक्त करण्यात येत आहे. अवघ्या १५ दिवसाने चमत्कारीरीत्या कोरोनावर मात करुन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास गावाला अखेर यश लाभले आहे.

बॉक्स

अवैध दारु विक्रीने केला घात

ब्राम्हणटोला गावात कोरोनाची लाट येऊन गेली. याबाबत चौकशी केली असता परवानाधारक दारु दुकाने बंद असताना या गावात काही लोकांनी अवैध दारु विक्री सुरु केली. त्या ठिकाणी गावाचेच नाही तर इतर बाहेर गावचे मद्यपी सुद्धा मद्यपान करायला येत. हळूहळू मद्यपी लोकांची गर्दी वाढत गेली आणि कोरोनाची लागण झाली.

कोट

स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने गावात आरोग्य शिबिर लावून नियमित कोरोना चाचणी करुन औषधोपचार करण्यात आला. गावात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत कोरोना बद्दल जनजागृती करण्यात यश आले.

- डॉ. राजू रघटाटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध

....

वेळेवर लोकांची समजूत काढण्यात यश आले. त्यावर आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता व प्रशासनाच्या सहकार्यामुळे गावातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले.

बद्रिप्रसाद दसरिया, सरपंच ग्रामपंचायत कावराबांध