शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

गोंदिया : १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळताच या गटातील तरुणांनी लसीकरण केंद्राची धाव घेतल्याने लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली ...

गोंदिया : १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळताच या गटातील तरुणांनी लसीकरण केंद्राची धाव घेतल्याने लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली असून त्यामुळे लसीचे डोस संपले आहेत. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात बुधवारी (दि.३०) काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण झाले. तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यातील संपूर्ण साठाच संपल्याने लसीकरणाचा ब्रेक लागला होता.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे लसींचा पुरवठा सुरू आहे. परिणामी, आतापर्यंत सातत्याने लसीकरण सुरू असून नागरिकांच्या सुविधेसाठी आता जिल्ह्यात सुमारे १२५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. एवढेच नव्हे तर गावागावांत जा‌ऊन तसेच शहरात प्रभागनिहाय लसीकरण शिबिर घेतले जात आहे. याचे चांगले फलितही मिळत असून २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४३६३६७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लसींचा तुटवडाही तेवढा जाणवला नसून उलट लसींचा साठा उपलब्ध होता. मात्र, २२ जूनपासून जिल्ह्यात १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाले व सुमारे ६.२५ लाभार्थ्यांच्या या गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावले आहेत. लसीकरण सुरू झाले तेव्हापासून त्यांना लसीकरणाची उत्सुकता होती व परवानगी मिळताच ते आता समोर येत आहेत. परिणामी, आतापर्यंत ७७६०५ तरुणांचे लसीकरण झाले असून दिवसाला सुमारे १२०००-१५००० तरुणांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र उपलब्ध साठा संपला आहे. यामुळेच ३० जून रोजी काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करता आले, तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लावावा लागला होता.

------------------------------------

अद्याप काही मेसेजही नाही

जिल्ह्यातील लसींचा डोस संपल्याने लसीकरणाला आता ब्रेक लावण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अशी स्थिती आली असता लगेच लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कित्येकदा अशी स्थिती निर्माण झाली असून प्रत्येक वेळी लगेच लसींचा साठा उपलब्ध करवून देण्यात आला आहे. मात्र, यंदा राज्यात सर्वत्र लसींचा तुटवडा असल्याची माहिती असून लस कधी मिळणार, याबाबत अद्याप तरी काहीच मेसेज आला नसल्याची माहिती आहे.

----------------------------

दुसऱ्या डोसवाले वाट बघत

जिल्ह्यातील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस आला आहे अशा कित्येकांना मेसेज पाठविला जात आहे. मात्र, लसीकरण बंद असल्याने त्यांना आता लसींचा पुरवठा होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. विशेष म्हणजे, १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाल्याने केंद्रांवर तरुणांची एकच गर्दी होत आहे. अशात अन्य नागरिक गर्दी बघूनच परत जातानाही दिसत आहे.