शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

लसीकरण सुरू झाले तेव्हापासून त्यांना लसीकरणाची उत्सुकता होती व परवानगी मिळताच ते आता समोर येत आहेत. परिणामी, आतापर्यंत ७७६०५ तरुणांचे लसीकरण झाले असून दिवसाला सुमारे १२०००-१५००० तरुणांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र उपलब्ध साठा संपला आहे. यामुळेच ३० जून रोजी काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करता आले, तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लावावा लागला होता. 

ठळक मुद्देलसींचा साठाच संपला : लसीकरणाचा वेग वाढल्याने डोस संपले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १८-४४  गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळताच या गटातील तरुणांनी लसीकरण केंद्राची धाव घेतल्याने लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली असून त्यामुळे लसीचे डोस संपले आहेत. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात बुधवारी (दि.३०) काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण झाले. तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यातील संपूर्ण साठाच संपल्याने लसीकरणाचा ब्रेक लागला होता. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे लसींचा पुरवठा सुरू आहे. परिणामी, आतापर्यंत सातत्याने लसीकरण सुरू असून नागरिकांच्या सुविधेसाठी आता जिल्ह्यात सुमारे १२५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. एवढेच नव्हे तर गावागावांत जा‌ऊन तसेच शहरात प्रभागनिहाय लसीकरण शिबिर घेतले जात आहे. याचे चांगले फलितही मिळत असून २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४३६३६७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लसींचा तुटवडाही तेवढा जाणवला नसून उलट लसींचा साठा उपलब्ध होता. मात्र, २२ जूनपासून जिल्ह्यात १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाले व सुमारे ६.२५ लाभार्थ्यांच्या या गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावले आहेत. लसीकरण सुरू झाले तेव्हापासून त्यांना लसीकरणाची उत्सुकता होती व परवानगी मिळताच ते आता समोर येत आहेत. परिणामी, आतापर्यंत ७७६०५ तरुणांचे लसीकरण झाले असून दिवसाला सुमारे १२०००-१५००० तरुणांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र उपलब्ध साठा संपला आहे. यामुळेच ३० जून रोजी काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करता आले, तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लावावा लागला होता. 

अद्याप काही मेसेजही नाही - जिल्ह्यातील लसींचा डोस संपल्याने लसीकरणाला आता ब्रेक लावण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अशी स्थिती आली असता लगेच लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कित्येकदा अशी स्थिती निर्माण झाली असून प्रत्येक वेळी लगेच लसींचा साठा उपलब्ध करवून देण्यात आला आहे. मात्र, यंदा राज्यात सर्वत्र लसींचा तुटवडा असल्याची माहिती असून लस कधी मिळणार, याबाबत अद्याप तरी काहीच मेसेज आला नसल्याची माहिती आहे. दुसऱ्या डोसची अनेकांना प्रतीक्षा - जिल्ह्यातील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस आला आहे अशा कित्येकांना मेसेज पाठविला जात आहे. मात्र, लसीकरण बंद असल्याने त्यांना आता लसींचा पुरवठा होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. विशेष म्हणजे, १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाल्याने केंद्रांवर तरुणांची एकच गर्दी होत आहे. अशात अन्य नागरिक गर्दी बघूनच परत जातानाही दिसत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या