शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातील कोरोना चाचणी बंद,अडचणीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

कोरोनाचे थैमान थांबता थांबेना असेच चित्र आहे. लहान मुलांपासून तर युवक,वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या संक्रमणाने ग्रासले आहे. थोडा जरी उपचाराला उशीर झाला तरी ते जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपचार सुरू करण्यासाठी निदान होणे आवश्यक असते. मात्र अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन दिवसापासून कोरोना चाचणी करणे बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांची तारांबळ : मनुष्य बळाचा अभाव : संसर्गात वाढ होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र मागील दोन दिवसापासून येथील ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी आणि रॅपिड टेस्ट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोरोना चाचणी बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाचे थैमान थांबता थांबेना असेच चित्र आहे. लहान मुलांपासून तर युवक,वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या संक्रमणाने ग्रासले आहे. थोडा जरी उपचाराला उशीर झाला तरी ते जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपचार सुरू करण्यासाठी निदान होणे आवश्यक असते. मात्र अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन दिवसापासून कोरोना चाचणी करणे बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. कोरोना चाचणीसाठी आलेल्या अनेेकांना आल्या पावलीच परतावे लागत आहे. यामुळे संसर्ग कमी होण्याऐवजी त्यात वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगत मनुष्यबळ उपलब्ध होताच चाचण्या सुरळीतपणे सुरु केल्या जातील असे सांगितले. मात्र तोपर्यंत चाचणीसाठी येणाऱ्यांची समस्या कायम आहे. ग्रामीण भागातील स्टॉफ जिल्हास्तरावर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. अशात आता ग्रामीण भागातील काही डॉक्टर आणि परिचारिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलविण्यात आले आहे. तर काही स्टाफ बाहेर जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर पाठविला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे. गावच्या गावे होत आहेत बाधित अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. छाेट्या छोट्या गावात ४० ते ५० रुग्ण निघत असल्याने गावच्या गावे बाधित होत असल्याचे चित्र आहे. खांबी, नवेगाव, केशोरी, इटखेडा, बोंडगाव या गावांमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने बिकट समस्या निर्माण झाली आहे. या गावामध्ये कंटेनमेंट झोन देखील घोषित करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात आधीच मोजकाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. त्यातच आता ग्रामीण रुग्णालयातील काही स्टाफ कोविड केअर सेंटरसाठी नियुक्त करण्याचे आदेश वरुन धडकले आहेत. अशात नियोजन करायचेे कसे या पेचात सध्या तालुका आरोग्य अधिकारी आहेत.

ग्रामीण आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलाशहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे डॉक़्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून ते सुद्धा रात्रंदिवस काम करत आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा पर्याय नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या