शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात कोरोनाची पुन्हा झाली एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : मागील महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया तालुक्यात पुन्हा कोरोना शिरला असून सोमवारच्या (दि.१३) अहवालात एका बाधिताची नोंद घेण्यात ...

गोंदिया : मागील महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया तालुक्यात पुन्हा कोरोना शिरला असून सोमवारच्या (दि.१३) अहवालात एका बाधिताची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोरोना आला तेव्हापासून तालुका हॉटस्पॉट असून झपाट्याने बाधितांची संख्या वाढताना दिसून आली आहे. अशात आता तरी नागरिकांनी संयम बाळगून वावरणे हेच सर्वांसाठी सुरक्षेचे ठरणार आहे.

दुसऱ्या लाटेच्या कहरातून सावरत आलेल्या जिल्ह्यात नागरिकांच्या संयमानेच परिस्थिती सुधारताना दिसून येत आहे. हेच कारण आहे की, मे महिन्यातील पंधरवड्यानंतर जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली व आजही जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरता आले नाही. त्यातही विशेष बाब म्हणजे, गोंदिया व तिरोडा हे प्रमुख हॉटस्पॉट कोरोनामुक्त झाल्याने धोका कमी झाला होता. यामुळेच नागरिक चांगलेच बिनधास्तपणे वावरत आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी-जास्त होत असतानाच मध्यंतरी ती ८ पर्यंत पोहोचली होती.

त्यानंतर आता आकडेवारी घसरली असून जिल्ह्यात आता फक्त २ बाधित उरले आहेत. यात मात्र धोक्याची बाब म्हणजे, यातील एक बाधित गोंदिया तालुक्यातील असून दुसरा बाधित देवरी तालुक्यातील आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट ठरला आहे. त्यात आता १ का असोना मात्र बाधित आढळल्याने पुन्हा कोरोना शिरला असून धोका वाढला आहे.

------------------------------

त्रिसूत्रीचे पालन गरजेचे

कोरोनापासून बचावासाठी आपल्या हाती आता लस आली आहे. मात्र, कित्येक नागरिक लसीकरणाला पाठ दाखवीत असल्याने हा प्रकार धोक्याचा आहे. त्यानंतर तोंडावर मास्क, सॅनिटायझर-साबणाने हात स्वच्छ धुणे व शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीने आता जाणेच गरजेचे झाले आहे.

-----------------------------

लस न घेतलेली एक व्यक्तीही धोक्याची

कोरोनाची लस घेतल्याने एकतर त्या व्यक्तीवर कोरोना हावी होत नाही. शिवाय त्या व्यक्तीपासून दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता शून्य आहे. म्हणजेच, लस घेतलेला व्यक्ती स्वत: सुरक्षित असून त्यापासून अन्य कुणालाही धोका नाही. मात्र, लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनापासून धोका असतानाच त्यापासून अन्य व्यक्तींनाही लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे अशी एकही व्यक्ती आता लसीपासून वंचित राहून नये ही खबरदारी घेण्याची गरज आहे.