शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रतिष्ठानांवर येणार कारवाईचे गंडांतर

By admin | Updated: November 28, 2015 02:55 IST

तपासणीदरम्यान घेण्यात आलेले खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात दुषित आढळल्याने शहरातील दोन प्रतिष्ठानांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.

खाद्य पदार्थांचे नमुने दूषित : आतापर्यंत ४१ नमुन्यांची तपासणीगोंदिया :तपासणीदरम्यान घेण्यात आलेले खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात दुषित आढळल्याने शहरातील दोन प्रतिष्ठानांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) न्यायालयात जाणार आहे. यासाठी विभागाकडून कारवाई सुरू असून तसा प्रस्ताव विभागाच्या मुंबई कार्यालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.खाद्य पदार्थांत होत असलेल्या भेसळीमुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत. आज प्रत्येकच पदार्थात भेसळ होत असून त्यात धान्यच काय तयार खाद्यपदार्थ सुटत नाहीत. या प्रकारामुळे मात्र सकस आहार हिरावून गेले असून आपल्या फायद्यासाठी व्यापारी लोकांना जहर खाऊ घालू लागले आहेत. भेसळीच्या या प्रकारांवर आळा घालता यावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने धान्य व खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. या कारवाई दरम्यान विभागाकडून त्या पदार्थांचे नमूने घेतले जातात व त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याच्या अहवालानुसार कारवाई पुढील कारवाई केली जाते. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत विभागाकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणचे नमुने घेण्यात आले. विविध धान्य व खाद्यपदार्थांचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील ३० नमूने प्रमाणीत असून ३ नमूने कमी दर्जाचे तर दोन नमूने असुरक्षीत (दुषित) आढळले आहेत. उर्वरीत नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नसल्याची माहिती आहे. प्रमाणीत नमूने म्हणजेच ते खाण्यासाठी योग्य असल्याचे निष्पन्न होते. कमी दर्जाचे म्हटल्यास खाण्यायोग्य म्हणता येणार नाही. अशा या पदार्थांतूनच शरीराला विविध आजारांना पुढे जावे लागते. असुरक्षित म्हणजे खाण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट होते. (शहर प्रतिनिधी)