शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व सफाईसाठी कंत्राटी कामगार

By admin | Updated: June 5, 2016 01:26 IST

मान्सूनपूर्व सफाई अभियानाला शहरात सुरूवात झाली असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे.

मनुष्यबळात २० ची भर : शहरातील नालीसफाईसाठी सोमवारचा मुहूर्तगोंदिया : मान्सूनपूर्व सफाई अभियानाला शहरात सुरूवात झाली असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. मात्र छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी नियमित स्वच्छता कर्मचारी असतानाही विशेष निविदा काढून आणखी २० कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २० कामगारांच्या कंत्राटदाराकडून सोमवारपासून (दि.६) शहरातील नाल्यांची सफाई केली जाणार आहे. पावसाचे पाणी साचून राहू नये व शहरवासियांना त्यापासून त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेकडून पावसाळ््यापूर्वी सफाई अभियान राबविले जाते. या सफाई अभियानांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून जेसीबीच्या माध्यमातून शहरातील पाण्याची निकासी करणाऱ्या मोठ्या नाल्यांचा गाळ काढून त्यांना मोकळे केले जाते. याशिवाय सफाई कामगारांकडून शहरातील लहान नाल्यांची सफाई करून पाण्याची निकासी व्हावी यासाठी व्यवस्था केली जाते. शहरात जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय शहराच्या आतील भागात असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी सफाई कामगारांचे एक पथक कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी या कामगारांच्या माध्यमातून सफाई करविण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषदेने निविदा मागविली होती. शुक्रवारी (दि.३) निविदा काढण्यात आली असून उत्कल सफाई संस्थेला हे काम देण्यात आले आहे. यामध्ये २० सफाई कामगारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आता सोमवारपासून (दि.६) सफाईचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)लेटलतिफ कारभार ७ जूनपासून मृग नक्षत्र लागणार असून मान्सून कधीही धडकणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही सर्व कामे किमान १०-१५ दिवसांपूर्वी आटोपून घ्यायला हवी होती. मात्र स्वच्छता अभियानातील लेटलतिफ कारभारामुळे तीन दिवसांपूर्वी सफाई कामगारांची निविदा उघडण्यात आली. हेच काम अगोदर करून आतापर्यंत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.