शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सहा कोटींच्या सिमेंट नाल्यांचे बांधकाम

By admin | Updated: May 23, 2015 01:42 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, ....

गोंदिया : शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, पिकांसाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी माती नाला बांध, सिमेंट नाला बांध व शेततळे आदी कोट्यवधी रूपये खर्चून कामे केली जातात. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांत जिल्हाभरात एकूण ८३ सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी सहा कोटी चार लाख नऊ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सन २०१४-१५ मध्ये जिल्हाभरात कोट्यवधी रूपयांची कामे करण्यात आलीत. जिल्हाभरात भात खाचरे दुरूस्ती व मजगीचे काम ४१२५.९३ हेक्टरे क्षेत्रात करण्यात आले. त्यासाठी १२१९.१२ लाख रूपयांचा खर्च आला. बोडी खोलीकरणाची १३ कामे करण्यात आली. त्यासाठी ७.३१ लाख रूपये खर्च करण्यात आले. नाला खोलीकरणची १५ कामे करण्यात आली. त्यासाठी ५८.२० लाख रूपयांचा खर्च आला. जिल्हाभरात ४४ शेततळे तयार करण्यात आले. त्यासाठी ५०.५९ लाख रूपये खर्च करण्यात आले. तर माती नाला बांधकाम केवळ चार करण्यात आले. त्यासाठी २९.५६ लाखांचा खर्च आला आहे. ही सर्व कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आले आहेत.एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून जिल्हाभरात वर्षभरात एकूण ८३ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. त्यासाठी तब्बल ६०४.०९ लाख रूपयांचा खर्च आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. ही सर्व कामे थेट कंत्राटदारामार्फत न करता निविदेच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही कृषी विभागाने सांगितले आहे. सिमेंट नाला बांधकामामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे सभोवारची शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या पिकांना हवे त्यावेळी त्याद्वारे पाणी पुरविण्याचे कार्य होत असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक-अर्जुनी ही दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांमध्ये सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. याचा कितपत लाभ शेतकऱ्यांना होईल, हे पुढील हंगामातील उत्पन्नानुसार कळणार आहे. शिवाय बांधकामाबाबत कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शासन शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून विविध कृषी योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च करते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच ‘जैसे थे’ असतात. त्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय ठरत आहे. (प्रतिनिधी)