शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या सभेत गोंधळ

By admin | Updated: September 30, 2015 05:20 IST

दवनीवाडा येथे दारूबंदीसाठी आयोजित महिलांच्या विशेष सभेत ६२४ महिलांनी सहभाग घेतला. मात्र नियमानुसार

गोंदिया : दवनीवाडा येथे दारूबंदीसाठी आयोजित महिलांच्या विशेष सभेत ६२४ महिलांनी सहभाग घेतला. मात्र नियमानुसार गावातील १३९२ महिला मतदारांपैकी ५० टक्के महिलांची मते दारूबंदीसाठी आवश्यक असल्याने येथे बाटली आडवी होऊ शकली नाही. मात्र गावकरी महिलांनी गावातील मतदार यादीच चुकीची असल्याचे सांगत गोंधळ घातला. या गोंधळातच ही सभा आटोपती घेण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, दवनीवाडा येथील ग्रामपंचायतच्या ठरावानुसार गावात पूर्णपणे दारूबंदी लागू करण्यासाठी मंगळवारी (दि.२९) सभा निश्चित केली होती. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांसह दवनीवाडयाचे ठाणेदार, गटविकास अधिकारी तसेच सरपंच तिजाबाई मस्करे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, तंमुस अध्यक्ष भैयालाल सूर्यवंशी, महिला सभेच्या अध्यक्ष माजी पं.स.सदस्य सरस्वताबाई हेमने, दारूबंदी समितीच्या अध्यक्ष सुरेखा मुंडेले आदी उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभा सुरू झाली. मात्र मतदार यादीत गावातून स्थलांतरित झालेल्या आणि मृत झालेल्या मतदारांचीही नावे असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यातच मतदान घेण्यात आले. त्यात ६२४ महिलांनी दारूबंदीच्या बाजुने मतदान केले. पण दारूबंदी लागू करण्यासाठी ६९४ (५० टक्के) मते मिळाली नाही. त्यामुळे महिलांनी गोंधळ घालत सभा तहकूब करण्याची मागणी केली. सभेच्या अध्यक्ष सरस्वताबाई हेमने यांनी ठरावावर स्वाक्षरीही करण्यास नकार दिला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याशी चर्चा केली असता अशा पद्धतीने सभा तहकूब करता येत नसून आज दारूबंदीचा ठराव बारगळल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)बेरडीपारमध्ये दारूमुक्तीचा संकल्पबिर्सी फाटा : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार खुर्शी येथे महिला शक्ती जागृत झाली असून त्यांनी गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या व दारुबंदी समितीच्या तसेच ग्रामपंचायत बेरडीपारच्या वतीने महिला मेळावा घेऊन दारूमुक्तीचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माधुरी रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष ममता बैस, जिल्हा परिषद सदस्य रजनी सोयाम, पंचायत समिती सदस्य रमनिक सयाम, तहसीलदार रवींद्र चौहाण, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, मंदाकिनी गाढवे, माया पारधी, छबीलाल भाऊ पटले, सरपंच सरिता राणे, उपसरपंच रमेश साठवणे, पोलीस पाटील रतन खोब्रागडे उपस्थित होते. संचालन के.डी. भेलावे यांनी तर प्रास्ताविक पोलीस पाटील रतन खोब्रागडे यांनी केले. आभार प्रभाकर ठाकरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाठी दारुबंदी समितीच्या महिला अध्यक्ष अंजिरा साठवणे, उपाध्यक्ष कविता उईके, सचिव शामकला सावठणे व महिलांनी सहकार्य केले.