शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:24 IST

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : निवडणूक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एस.एन.चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात रोकड व दारु च्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्याचे सांगितले.तसेच, आचारसंहिता लागू होताच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. धार्मिक स्थळांवर निवडणुकीचा प्रचार करण्यास पूर्णत: बंदी आहे. दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे हा एक गुन्हा आहे. मतदान करण्याकरीता दिव्यांग व्यक्तीची जाण्या-येण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर फक्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत चालू राहील याची पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगीतले.राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराच्या ‘रोड शो’साठी पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्लास्टीकचा वापर टाळायचा आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नविन कार्यक्र म सुरु करता येणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीविषयी कुठलीही सभा होत असेल तर पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.आचारसंहिता लागू होताच शासकीय होर्डींगवरील फ्लेक्स २४ तासांत काढून घ्यायचे आहेत, तर खाजगी क्षेत्रातील होर्डींगवरील फ्लेक्स ७२ तासांत काढायचे आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईबैठकीत आदर्श आचारसंहिता विषयक माहिती देताना डॉ. बलकवडे यांनी, लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडावी. आचारसंहितेत कोणत्याही अधिकाºयांनी राजकीय पदाधिकाºयांशी भेट घेवू नये, नाही तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी