शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना ५१९ गावांत

By admin | Updated: August 17, 2014 23:14 IST

गणेशोत्सवादरम्यान होणारे वाद, मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून उद्भवलेले क्षुल्लक गुन्हे गंभीर गुन्ह्यात परिवर्तीत होतात. यातून गावाची शांतता धोक्यात येते. ही शांतता अबाधित राखण्यासाठी

फलश्रुती : दंगलीने धगधगती सडक/अर्जुनी शांतनरेश रहिले - गोंदियागणेशोत्सवादरम्यान होणारे वाद, मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून उद्भवलेले क्षुल्लक गुन्हे गंभीर गुन्ह्यात परिवर्तीत होतात. यातून गावाची शांतता धोक्यात येते. ही शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा ५५६ पैकी ५१९ गावात ही संकल्पना राबविली जात आहे.२९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन होत आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदा ७४८ सार्वजनिक गणेश, चार हजार १८५ खासगी तर ५१९ गावात ‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण पाच हजार ४५१ श्रींची स्थापना होणार आहे.‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात येत आहे. आमगाव तालुक्याच्या ५७ गावात एक गाव, एक गणपती, ६० ठिकाणी सार्वजनिक गणपती तर ४०० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ५७ गावात एक गाव, एक गणपती, ६३ ठिकाणी सार्वजनिक तर १५५ ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे.गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गावात एक गणपती, ८५ ठिकाणी सार्वजनिक मूर्ती तर एक हजार खासगी मूर्ती स्थापन करणार आहेत. रागनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गावात एक गणपती, ४५ ठिकाणी सार्वजनिक गणेश तर ५५० ठिकाणी खासगी गणेश मूर्ती स्थापन होणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २७ गावांमध्ये एक गणपती, ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश तर १५० ठिकाणी खासगी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३६ गावात एक गणपती, ५१ ठिकाणी सार्वजनिक तर २६० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात एक गणपतीची संकल्पना राबविली जात आहे. ४० ठिकाणी सार्वजनिक तर १५० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ४२ गावांमध्ये एक गणपती, ५० ठिकाणी सार्वजनिक तर २५० ठिकाणी खासगी गणपती स्थापन केले जाणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत २३ गावात एक गणपती, ४० ठिकाणी सार्वजनिक तर १५० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात एक गणपती, १८ ठिकाणी सार्वजनिक तर ३० ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन होणार आहेत. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ५८ गावात एक गणपती, ८१ ठिकाणी सार्वजनिक तर २६५ ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात एक गणपती, ४० ठिकाणी सार्वजनिक तर १९५ ठिकाणी खासगी मूर्ती, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ४९ गावात एक गणपती, ४८ ठिकाणी सार्वजनिक तर ३० ठिकाणी खासगी, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३६ गावात एक गणपती, ४७ गावात सार्वजनिक तर ४३० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २३ गावात एक गणपती, २२ ठिकाणी सार्वजनिक तर ३५ ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन होणार आहेत. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १५ गावात एक गणपती, २६ ठिकाणी सार्वजनिक तर १२५ ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन केले जाणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने ५१९ गावात एक गाव एक गणपती, ७४८ ठिकाणी सार्वजनिक तर चार हजार १८५ ठिकाणी खासगी गणेशमूर्तीची स्थापना करणार आहेत. तंटामुक्त मोहीम सुरू होण्याअगोदर सडक/ अर्जुनी येथे मूर्ती विसर्जनादरम्यान हिंदू-मुश्लीम यांच्यात नेहमीच वाद होत असे. मात्र तंटामुक्त गाव समितीने दंगलीने हे धगधगते गावही शांत केले आहे.