शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार देण्यासाठी ‘ती’ गेली पिस्तुलसह एसपी कार्यालयात

By admin | Updated: July 13, 2016 02:25 IST

पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी व घरगुती कलहाची तक्रार देण्यासाठी एका महिलेने चक्क आपल्या पर्समध्ये पिस्तुल नेल्याचा प्रकार....

घरगुती कलह : सहाय्यक फौजदाराच्या पत्नीचा प्रताप गोंदिया : पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी व घरगुती कलहाची तक्रार देण्यासाठी एका महिलेने चक्क आपल्या पर्समध्ये पिस्तुल नेल्याचा प्रकार गोंदियात घडला. ही पिस्तुल छर्ऱ्याची असली तरी त्यापासून मानवी जीवास हाणी पोहोचत असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही महिला चक्क एका सहायक पोलीस उपनिरिक्षकाची पत्नी आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली. रजनी नंदनवार (४५) रा.फुलचूरनाका गोंदिया असे त्या महिलेचे नाव आहे. तिचे पती सीएमएस सेलमध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. घरगुती वादासंदर्भात ती पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करायला गेली होती. परंतु पहारेकरी महिला शिपाई नेताम यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या पर्सची झडती घेतली असता ती पिस्तुल आढळली. ती जप्त करण्यात आली. जवळ अशा पद्धतीने पिस्तुल बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे ही बाब आपल्याला माहित नव्हती, असे नंदनवार यांनी पोलिसांना सांगितले. मागील वर्षी ती पिस्तुल त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून पोस्टाने मागविली होती. एका वृत्तपत्रात जाहीरात वाचल्यावर संपर्क साधून आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने ती मागविल्याचे नंदनवार यांनी पोलिसांना सांगितले. आपण संस्थेचे काम करीत असताना महत्वाचे कागदपत्र आपल्याजवळ राहतात. म्हणून आपले कागदपत्र कुणी हिसकावू नये म्हणून ती पिस्तुल आपण बाळगत होते, ती खऱ्याखुऱ्या गोळ्याची नसून छर्ऱ्यांची पिस्तुल असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी नंदनवार यांच्या घरी झडती घेतल्यावर त्या पिस्तुलाचे ८० छर्रे देखील जप्त केले. ती पिस्तुल छर्ऱ्याची असले तरी तिला ट्रीगर असल्यामुळे सदर महिलेवर कारवाई करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, ६, २५ सकलम १३५, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)