शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यात क्षमता निर्माण करते

By admin | Updated: June 19, 2016 01:35 IST

अथक कष्ट, निश्चय, ध्येय व दुर्दम्य आत्मविश्वास यांच्या बळावरच स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी टिकू शकतो.

राम वाघ : तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा थाटात आमगाव : अथक कष्ट, निश्चय, ध्येय व दुर्दम्य आत्मविश्वास यांच्या बळावरच स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी टिकू शकतो. स्पर्धा परिक्षेतील अभ्यास केवळ प्रशासकीय अधिकारी बनवित नाही. तर विद्यार्थ्यांत प्रशासकीय अधिकाऱ्यांची योग्यताही निर्माण करते, असे प्रतिपादन नागपूरच्या आकार फाऊंडेशनचे संचालक राम वाघ यांनी केले. येथील लक्ष्मणराव मानकर गुरूजी संकुलात बुधवारी (दि.१५) राज्य तंत्र्शिक्ष मंडळाच्यावतीने आयोजित स्थलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी मेश्राम, लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य संदीप हनवते, एस.बी.आयचे अधिकारी पंकज शरणागत, नितीन इंदुरवाडे, कोरसटवार, मनोज लुलू, अंजनकर, बेनीमाधव कावळे उपस्थित होते. याप्रसंगी मानकर यांनी, संधी उपलब्ध करवून देणे हे आमच्या हाती असले तरीही त्या संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आपले व आपल्या परिसराचे नावलौकिक करावे अशी इच्छाही व्यक्त केली. तर गज्जलवार यांनी, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी, त्यातील अडचणी व मार्ग यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांना अतिशय सोप्या शब्दात उत्तरे दिली. प्रास्ताविक डॉ. संधी यांनी मांडले. संचालन प्रा. जयंत बंसोड यांनी केले. आभार प्रा. हनवते यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. राहूल संघी, प्रा.पंकज कटरे यांच्यासह मानकर ग्रुपच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनो ‘सैराट व्हा’मेळाव्यात मार्गदर्शन करताना राम वाघ यांनी विद्यार्थ्यांना सैराट व्हा, असा मंत्र दिला. मात्र कोणतीही नोकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसते, तर ती देश आणि समाजसेवेची उत्तम संधी असते याचा भान ही करवून दिला.