शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूस्थिती जाणूनच टिपणी करा

By admin | Updated: July 1, 2016 01:50 IST

शासकीय मेडीकल कॉलेजची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सन २००९ मधील निवडणूक घोषणापत्रात केली होती.

पृथ्वीपालसिंह गुलाटी : टीका करणाऱ्यांना लगावला टोला गोंदिया : शासकीय मेडीकल कॉलेजची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सन २००९ मधील निवडणूक घोषणापत्रात केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकताच त्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेडीकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू असताना पुढे न येता आता मात्र भारतीय जनता पक्षातील एक नेता टिकाटिपणी करीत आहे. मात्र त्यांनी वस्तूस्थिती जाणून टिपनी करायला हवी असा टोला कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी यांनी पत्रकातून लगावला आहे. पत्रकानुसार, डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर सत्रात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंदिया शासकीय मेडीकल कॉलेजला मंजूरी दिली होती. तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांनी कॉलेजसाठी १४२ कोटींचा निधी, कुडवा येथील जागेचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्च २०१४ मध्ये घेतला होता. तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी जागा, डीन डॉ. केवलिया यांची नियुक्ती, ५१० पदांची निर्मिती इत्याही कारवाई केली होती. त्यानंतर आता प्रफुल अग्रवाल यांच्या जनहित याचिकेमुळे कॉलेजला मंजूरी मिळाली. कॉलेज मंजूरीचे श्रेय आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री प्रफुल पटेल, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले यांना दिले आहे. असे असतानाही भाजपातील एक नेता ते फक्त एकटेच श्रेय लाटत असल्याची टिपनी पत्रक वाटून करीत आहे. यासाठी त्यांनी वस्तूस्थिती जाणून घ्यावी असा सल्ला देत टोला गुलाटी यांनी लगावला आहे. (शहर प्रतिनिधी)