शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी येथील सार्वजनिक गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

केशोरी : येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम गेल्या तीस वर्षांपासून राबविण्यात येत आहे. ...

केशोरी : येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम गेल्या तीस वर्षांपासून राबविण्यात येत आहे. हे मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजरा करून अनेक शाळांच्या सहभागातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात या गणेश मंडळाचा हातखंडा आहे.

कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ठाणेदार संदीप इंगळे यांनी आयोजित केलेल्या गाव शांतता समितीच्या बैठकीतून दिलेल्या सूचनांचे पालन करीत यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बगल देऊन आरोग्य विषयक कार्यक्रमावर भर देण्यात आला. त्या संदर्भाने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांच्या मार्गदर्शनात लसीकरण पथक प्रभारी राखी हाडगे, गेडाम, हिना वावरे यांच्या आरोग्य पथकाने मंडळाच्या सभामंडपात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर पार पाडण्यात आले. शिबिरासाठी नगारिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने ३५० जणांना कोव्हॅक्सीन लसीचे डोस देऊन लसीकरण शिबिर यशस्वी करण्यात आले. अध्यक्ष एकनाथ राणे, धनंजय नेवारे, विलास बोरकर, दुर्गेश बोरकर, प्रवीण नेवारे, किशोर नेवारे, शुभम खोब्रागडे, ईश्वर नेवारे यांनी सहकार्य केले.