शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करा

By admin | Updated: January 18, 2017 01:30 IST

मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजुनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय,

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : साखरीटोला येथे कुणबी समाज अधिवेशन साखरीटोला : मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजुनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाहीत. आपले अधिकार जाणून घेऊन जे एका व्यक्तिला महत्व नसते ते संघटनेला महत्व असते. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करण्याची गरज असल्याचे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी काढले. युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोला (सातगाव) तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोल्याच्या पटांगणावर आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक बनगाव जि.प. सदस्य सुखराम फुंडे, अतिथी म्हणून जि.प. सदस्य लता दोनोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) बागडे, विजय बहेकार, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, वनक्षेत्राधिकारी एल.एस. भुते, काशिराम हुकरे, माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे व अन्य अतिथी मंचावर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सविता बेदरकर म्हणाल्या, समाज हितासाठी सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. संघटनेशिवाय समाजाला महत्व नाही असे सांगत सर्वच क्षेत्रात कुणबी समाजाने पाय रोवण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी विजय बहेकार, लता दोनोडे, सुखराम फुंडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी उपवर-वधू परिचय मेळावा, हळदी-कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे यांनी केले. आभार डॉ. संजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा कुणबी समाज सेवा स्थायी समितीचे अध्यक्ष भुमेश्वर मेंढे, सचिव कमलबापू बहेकार, प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, युवराम कोरे, युवा कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष देवराम चुटे, पृथ्वीराज शिवणकर, संतोष बोहरे, रामदास हत्तीमारे, नामदेव दोनोडे, प्रकाश दोनोडे, अरविंद फुंडे, संजय बागडे, शैलेष मेंढे, निलकंठ दोनोडे, प्रेमलाल ठाकरे, राजू काळे, श्यामलाल दोनोडे, मनोज चुटे, डॉ. संजय देशमुख, डॉ. हेमंत फुंडे, संजय दोनोडे, डॉ. रमेश बोहरे, देवेंद्र मुनेश्वर, प्रकाश राऊत, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, चैतराम चुटे, मोहन दोनोडे, रमेश बहेकार, मनोज डोये व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.(वार्ताहर)