शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कटंगी डॅममध्ये मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST

गोंदिया : मान्सूनपूर्व तयारी २०२१च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पूर परिस्थितीत शोध बचाव कार्य संबंधाने गोरेगाव कटंगी ...

गोंदिया : मान्सूनपूर्व तयारी २०२१च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पूर परिस्थितीत शोध बचाव कार्य संबंधाने गोरेगाव कटंगी डॅममध्ये शनिवारी (दि.२९) शोध व बचाव कामाची रंगीत तालीम घेण्यात आली.

मागील वर्षी सन २०२० मध्ये जिल्ह्यात आलेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन, या वर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूर परिस्थितीत सुरक्षा व बचावाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थितीत जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूर परिस्थितीत तत्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकातर्फे रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नागपूर येथून आलेले मोजेस कॉन्द्रा, निकेश चिखलोंडे, शोध बचाव पथकाचे सदस्य किशोर टेंभुर्णे, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराडे, दिनू दीप, इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिरेपुंजे आदी उपस्थित होते. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे, तसेच हवामान खाते व पूर परिस्थितीसंदर्भात नागरिकांना व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता, तालुका व गावपातळीवर व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत आहेत.