शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : सध्या असलेले ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोक्याचे असून अशांना त्रास जाणवतो. अस्थमा रुग्णांना एक तर धूळ, धूर, ...

गोंदिया : सध्या असलेले ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोक्याचे असून अशांना त्रास जाणवतो. अस्थमा रुग्णांना एक तर धूळ, धूर, वातावरणातील बदल, थंड पदार्थ आदींची ॲलर्जी असल्याने जास्त त्रास जाणवतो व सध्याचे वातावरण असे त्रास उद्भवणारेच दिसून येत आहे. यामुळेच अस्थमा रुग्णांना त्रास जाणवत असल्याचे दिसून येत असून अशा रुग्णांची संख्या वाढत आहे.

--------------------------

प्रतिकारशक्ती कमी

अस्थमा रुग्णांची प्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी असते, यात शंका नाही. शिवाय हा त्रास अनुवंशिकही असू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला असा त्रास असल्यास अन्य सदस्यांनाही तो होतो. यामुळे प्रतिकारशक्ती व अनुवंशिकता या दोन्ही बाजू याला कारणीभूत ठरतात.

-------------------------

बालकांमध्ये अस्थमा

अस्थमाचा त्रास लहान मुलांनाही होऊ शकतो. वारंवार नाक बंद होणे, सर्दी होणे, दम लागणे, वातावरण बदलताच त्रास जाणवणे हे सर्व काही याचे संकेत म्हणता येतील. मात्र लहान मुले हे सर्व काही सांगत नाहीत. अशात पालकांनी वेळीच लक्ष देऊन आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

---------------------------------

ही घ्या काळजी...

अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सर्वप्रथम मास्कचा वापर करावा. त्यानंतर गर्दीत जाणे टाळावे, थंडीत फिरू नये, थंड पदार्थांचे सेवन टाळावे. एवढेच नव्हे, तर आपल्याला त्रास होतो, अशा वस्तूंपासून दूरच राहावे. तरीही त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

----------------------------

काळजी घेणे गरजेचे...

बदलत्या वातावरणाचा त्रास कित्येकांना जाणवतो व ही सुरुवात असते. यामुळे अशा त्रासदायक वस्तूंपासून दूर राहावे व काळजी घ्यावी. त्यानंतरही त्रास होत असल्यास अंगावर ओढवून न घेता लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- डॉ. हर्षदीप मेश्राम

छातीरोगतज्ज्ञ, गोंदिया.