शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गाळे बांधकाम बंद करा

By admin | Updated: May 8, 2016 01:42 IST

आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महसूल झुडपी जंगल या जागेवर जिल्हा परिषद अंतर्गत अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहे.

कारवाईसाठी उपोषण : ग्रामसभेने बांधकाम बंद पाडण्याचा केला ठरावआमगाव : आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महसूल झुडपी जंगल या जागेवर जिल्हा परिषद अंतर्गत अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम विरूध्द न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कार्यवाही अभियंता यांनी बांधकाम बंद करण्याचे लेखी निर्देश दिले. परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.या अवैध बांधकामाला उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये व शाखा अभियंता विजय ढोमणे यांनी बांधकामाला बंद करण्यास नकार दिला. याविरूध्द नागरिक ९ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचे लेखी निवेदन दिले आहे. आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत भूमापन महसूल गट क्रं.२३५ व २३६ या महसूल व झुडपी जंगल वनविभाग यांच्या मालकी जागेवर जिल्हा परिषद व अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार घडवून अनधिकृत व्यापारी गाळे बांधकामाला मंजूरी मिळविली. बांधकामपूर्वी महसूल व वनविभाग यांच्याकडून जमीनीचे हस्तांतरण व बांधका परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी या अनधिकृत बांधकाम विरूध्द उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचीका दाखल केली. सदर बांधकाम बंद करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. सदर अनधिकृत बांधकाम बंद करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सा.बा. जि.प.उपविभाग आमगाव यांना दिनांक ५ एप्रिल २०१६ ला लेखी निर्देश दिले. शासन परिपत्रकाप्रमाणे तक्रार नोंदविण्यासाठी ३ मे २०१६ ला पत्र दिले. त्याचप्रमाणे सदर अनधिकृत बांधकाम बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता जि.प.सा.बा. विभाग यांनी उपविभागीय अधिकारी जि.प.सा.बा. पी.पी.वाघाये यांना ३ मे २०१६ ला लेखी पत्र दिले. परंतु या पत्राला उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये व शाखा अभियंता विजय ढोमणे यांनी केराची टोपली दाखवून सदर अनधिकृत बांधकाम बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे या सदर बांधकामाविरूध्द नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीला त्यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई व्हावी यासाठी नागरिकांनी ९ मे पासून तहसील कार्यालय समोर उपोषण करण्याचे लेखी पत्र संबंधित विभागांना दिले आहेत. वाघाये व ढोमणेच्या हेकेखोरपणामुळे प्रशासनाची शोकांतिका अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम बंद करण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता जि.प.गोंदिया व तहसीलदार आमगाव यांनी उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये शाखा अभियंता विजय ढोमणे यांना दिले. परंतु वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय लेखी पत्राला न जुमानता बांधकाम सुरू ठेवले आहे. या मुजोर शाहीमुळे संपूर्ण प्रशासनाची शोकांतिका आहे. या मुजोर अधिकाऱ्यांविरुध्द शासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामसभेने अनधिकृत बांधकाम बंद करून ते पाडण्याच्या ठराव आमगाव ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेने केला आहे. जि.प.च्या अनधिकृत बांधकामाला प्रखर विरोध करीत सदर बांधकाम बंद करून पाडण्याचे ठराव एकमताने संमत केला आहे. (शहर प्रतिनिधी)