शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षणाला झाली सुरूवात

By admin | Updated: January 18, 2017 01:16 IST

शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे,

पथकातील दोघांचे आगमन : गुरूवारपर्यंत होणार सर्वेक्षण गोंदिया : शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारपासून (दि.१७) शहरात स्वच्छता सर्वेक्षणाला सुरूवात झाली. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण केले जात असून यासाठी पथकातील दोघांचे मंगळवारी आगमन झाले. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच स्वच्छता सर्वेक्षण हा नवा प्रयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हा प्रयोग केला जाणार असून यांतर्गत राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा असून यात गोंदिया शहराचीही निवड करण्यात आली आहे. यांतर्गत मंगळवारी (दि.१७) पथकातील कमलेश मिशाद व अंजन यादव या दोघांचे शहरात आगमन झाले व त्यांनी आपले काम सुरू केले. येत्या गुरूवारपर्यंत (दि.१९) हे सर्वेक्षण केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी) या भागांची केली पाहणी या सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेकडून माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे पथकातील कमलेश मिशाद यांनी शहरातील शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया, अंगूर बगिचा व मोक्षधाम परिसरातील रस्ते व स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक मुकेश शेंद्रे व अन्य कर्मचारी होते.