शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी देणार ‘स्वच्छता की ताली’

By admin | Updated: January 16, 2017 00:15 IST

प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला साद देत आता विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असून घरोघरी जावून ‘स्वच्छता की ताली’ देणार आहे.

कपिल केकत  गोंदिया प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला साद देत आता विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असून घरोघरी जावून ‘स्वच्छता की ताली’ देणार आहे. येथील ग्रीन गोंदिया फोरम या मंचच्यावतीने हा आगळावेगळा उपक्रम शहरात राबविला जाणार आहे. यांतर्गत नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी दर रविवारी शहरातील वेगवेगळ््या भागात जावून घरासमोर टाळी वाजवून घरच्या व्यक्तींना स्वच्छतेचे वचन देऊन त्यांच्याकडून वचन घेणार आहेत. देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. स्वच्छतेसाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. मात्र स्वच्छतेची ही सुरूवात स्वत: पासून करावयाची गरज असून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरून शहरातील निसर्ग प्रेमी मंडळांनी मिळून ‘ग्रीन गोंदिया फोरम’ची स्थापना केली आहे. तयार करण्यात आलेल्या मंचने स्वच्छतेच्या या जनजागृतीसाठी ‘स्वच्छता की ताली’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ते नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेत आहेत. ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी दर रविवारी शहरातील वेगवेगळ््या भागांत जावून प्रत्येक घरासमोर टाळी वाजविणार आहेत. या टाळीच्या माध्यमातून ते त्या घरच्या व्यक्तींना ‘मी’ स्वत: स्वच्छता राखणार असे वचन देणार असून ‘त्या’ व्यक्तीकडूनही स्वच्छता राखणार असे वचन घेत जनजागृती करणार आहेत. अशाप्रकारे हे विद्यार्थी शहरातील प्रत्येकच घरापर्यंत जावून स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. तर त्या व्यक्तीला आठवण रहावी यासाठी वचन देणार व घेणार आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम पुढे जाऊन फक्त नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यां पुरताच मर्यादीत ठेवला जाणार नसून शहरातील प्रत्येकच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात भाग घेता येणार आहे. कारण आजचा जेवढा जास्त विद्यार्थी वर्ग स्वच्छतेची स्वत:पासून सुरूवात करणार, तेवढ्याच जास्त प्रमाणात शहरातील प्रत्येकापुढे ‘स्वच्छता की ताली’ वाजविली जाणार. परिणामी तेवढ्या लोकांकडून स्वच्छतेचे वचन घेऊन स्वच्छतेच्या या उपक्रमात त्यांना सहभागी करता येणार आहे. असे झाल्यास स्वच्छतेच्या या उपक्रमाची एक चळवळ होऊन गोंदिया शहरात सुरू करण्यात येणारा हा उपक्रम अवघ्या देशासाठी राबविता येणार. त्यातून स्वच्छतेची चळवळ देशात सुरू होणार व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना फलीत मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत. - स्वच्छतेला देणार देशभक्तीची जोड आपण ज्या देशात राहतो तो देश स्वच्छ व सुंदर असावा. जेणेकरून त्यापासून अन्य देश प्रेरीत व्हावेत हा दृष्टीकोन ठेवून ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमांतर्गत स्वच्छतेला देशभक्तीची जोड दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थी देशभक्ती गीत गात शहरात सायकल रॅली काढून निघणार आहेत. तुम्ही देशभक्त असाल तर आपल्या देशाला स्वच्छ ठेवाल हा यामागचा दृष्टीकोन आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चौकांचौकांत व ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले जाणार आहेत. सामुदायीक जबाबदारी समजून हा उपक्रम राबविला जात आहे हे विशेष.