शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सफाई अभियानाचे काम दिसेना

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील चित्र जैसे थे : नाल्या तुंबलेल्या व कचरा पडूनच गोंदिया : मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही शहरातील नाल्या व कचऱ्याची स्थिती जैसे थेच दिसून येत आहे. यामुळे मान्सूनपूर्व सफाई अभियानाला घेऊन संभ्रम निर्माण होत असून सफाई अभियान राबविले जात असताना त्याचे काम मात्र दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्यावतीने मान्सनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. यंदाही नगर परिषदेने अभियान हाती घेतले. यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली. तर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईसाठी २० सफाई कामगारांची टीम कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आली आहे. जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांची सफाई केल्याचे नगर परिषदेकडून कळले. मात्र नाल्यांचे चित्र बघितल्यास ते होते तसेच दिसून येत आहेत. यातून नाल्यांतील गाळ पूर्णपणे उपसण्यात आला नसल्याचेही आता शहरवासी बोलत आहेत. याशिवाय शहरातील सांडपाण्याची निकासी करीत असलेल्या मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेने २० सफाई कामगार कंत्राटी तत्वावर घेतले आहेत. सोमवारपासून (दि.६) या सफाई कामगारांकडून नाल्यांची सफाई करविण्यात येणार असल्याचे सांगीतले गेले. मात्र या कामगारांकडून कोणत्या भागातील नाल्यांची सफाई करविण्यात आली हे कळतच नाही. विशेष म्हणजे शहरातील बाजार भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यांची सफाई करण्यात आली नाही. अशात पावसाच्या पाण्याची निकासी कशी होणार असा प्रश्न येथे पडतो. आता कधीही पाऊस बरसणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. असे असतानाही शहरातील नाल्या व घाण आहे त्यात स्थितीत असल्याने यंदाचा पावसाळा शहरवासीयांसाठी डोकेदुखीचाच ठरणार असल्याचे दिसते. त्यामुळे जोर लावून सफाईची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याची समस्या सुटणार नाही. (शहर प्रतिनिधी)