शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक करणार पोलीस मित्रांचे काम

By admin | Updated: November 28, 2015 02:58 IST

पोलिसांवर दिवसेंदिवस वाढत्या कामाचा ताण लक्षात घेत पोलिसांच्या मदतीसाठी आता पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी घेतला आहे.

संविधान दिन रॅली : पोलीस मित्र संमेलन व प्रभात फेरीगोंदिया : पोलिसांवर दिवसेंदिवस वाढत्या कामाचा ताण लक्षात घेत पोलिसांच्या मदतीसाठी आता पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी घेतला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आता नागरिक पोलीस मित्र म्हणून काम करणार आहेत.पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास गोंदिया येथील रामनगर पोलीस ठाणे येथे सुरूवात करण्यात आली. २६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यातील आवारात पोलीस मित्र संमेलन घेण्यात आले. या वेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. प्रकाश धोटे, सामाजिक कार्यकर्त्या धर्मिष्ठा सेंगर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्तविकातून पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस मित्र संमेलनामागची भूमिका विषद केली. पोलिसांना आता नागरिक मदत करणार असल्यामुळे अनेक बाबतीत नागरिकांची पोलीस मित्र म्हणून मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रत्येक माणसाने पोलीस म्हणून काम केले तर गुन्हेगारांवर वचक व सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगितले. संविधान दिनानिमित्त ते पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील एक आदर्श राज्यघटना निर्माण करून देशाला अर्पण केली आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे मानवी हक्क देऊन जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत या कायद्यांचा प्रचार-प्रसार आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, नागरिकांनी पोलिसांना मदत केल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल. अनेक गुन्ह्यांचा शोध घेण्यास पोलीस मित्रांची मदत होईल. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन या संकल्पनेमुळे बदलण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिक कामानिमित्त सहज पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना मदत करेल. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक जवळे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. या वेळी पोलीस मित्र, विविध शाळांचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी यांनी राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त रॅली काढून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. पोलीस बँड पथकाने राष्ट्रभक्ती गीताची धून वाजवून राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले. ही रॅली रामनगर पोलीस स्टेशन, पाल चौक, रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा, पाल चौक मार्गे रामनगर पोलीस स्टेशन येथे पोहोचली. पोलीस बँड पथकाच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी आदेश शर्मा, अ‍ॅड. अर्चना नंदागळे, आशा नागपुरे, अजय अग्रवाल, दिव्या भगत, सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. ताईतवाले, पी.पी. गराडे व पोलीस उपनिरीक्षक कोकाटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विविध प्रभागातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)