शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

महावितरणने विविध आकार व कर कमी करावे नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर ...

महावितरणने विविध आकार व कर कमी करावे

नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सवा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीजग्राहकांची आर्थिक लूट महावितरणने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.

रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो. रेतीमाफिया घाटांतून आणलेली रेती शहरातील वेगवेगळ्या भागात टाकून देत आहेत. याकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे.

रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ

सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला

गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. बघावे तेथे प्लॅस्टिक पि‌शव्याच दिसून येत आहेत.

‘ऑनलाइन’ खरेदी ग्रामीण भागात तेजीत

गोंदिया : ग्रामीण भागापर्यंत ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचतही होत असल्यामुळे अनेकजण ऑनलाइन वस्तू खरेदी करत असल्याचे दिसत आहे. मात्र अनेकदा काही फसव्या योजनांमुळे अनेकदा ग्राहकांच्या खात्यातून पैसे गेल्याच्याही तक्रारी वाढत आहेत.

अरुंद रस्त्याने अपघात बळावले

गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये मुरूम घालण्यात आला असला तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे

गोंदिया : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने, आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलद सेवा मिळावी, हा शासनाचा उदात्त हेतू आहे. मात्र हे देताना दिसून येत नाही.

घटत्या जनावर संख्येने दुग्ध व्यवसाय आला डबघाईस

अर्जुनी-मोरगाव : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे.

१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वतःची गरज भागूनसुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु, मागील काही वर्षांत पशुधनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे आता गावखेड्यांतही पॅकेटचे दूध मिळू लागले आहे. ग्रामीण भागांत जनावरे चराईसाठी जागा राखीव असायची व गुराखीसुद्धा असायचे. परंतु, आता जनावरे चारण्यासाठी गुराखी मिळत नाही. तर, चराईच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. वैरणला महागाईची झळ बसली आहे. दुधाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने देशी जनावरांकडून जास्त दूध उपलब्ध होत नाही. तर, संकरित जनावरे शेतकरी

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.

सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था

तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.

नाल्यांवरचे अतिक्रमण काढा

गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत.

दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.