शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
6
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
7
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
8
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
9
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
10
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
11
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
12
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
13
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
14
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
15
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
16
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
17
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
18
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
19
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
20
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचाराकडे नागरिकांचा कल

By admin | Updated: May 18, 2015 00:54 IST

वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.

गोंदिया : वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. ब्रिटिश काळापूर्वी भारतात आयुर्वेद उपचार उच्च शिखरावर होता. मध्यंतरी लवकर गूण मिळत असल्याने अ‍ॅलोपॅथिक उपचारांवर रूग्णांचा भर वाढत गेला. परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने जिल्ह्यात आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे रूग्णांचा कल पहावयास मिळत आहे. आयुर्वेद औषधी व उपचाराची वाढती मागणी लक्षात घेता शहरात आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देणारी अनेक औषधी दुकाने आलीत. ग्रामीण रूग्णालयातील आयुर्वेद चिकित्सा कक्ष हे रूग्णांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पक्षाघात, हाडांचे दुखणे, भगंदर, बवासीर या सारख्या अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार आयुर्वेद पद्धतीने करण्यात येत आहेत.त्यासाठी पंचकर्म, स्नेहल स्वेदन, बस्ती, नस्य, तर्पण इत्यादी उपचार प्रक्रिया केल्या जातात. आयुर्वेद उपचाराबरोबरच हळू पण खोलवर आजार बरा करीत असलेल्या होमियोपॅथी औषधोपचार पद्धतीकडेही रूग्णांचा कल वाढत आहे. आयुर्वेद उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस कित्येक नागरिकांचा कल दवाखान्यांकडे दिसून येत आहेत. आजच्या आधुनिक काळात विविध मशीन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूग्णांचा उपचार केला जातो. परंतु त्याचे दुष्परिणामही भयंकर होत असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब वाढत आहे. आधुनिक काळात आयुर्वेदातही भरपूर संशोधन झाले असून ही पद्धती अधिकाधिक विकसित होत आहे. तर साबूदाण्याच्या गोळ््या ओळखली जाणारी होमियोपॅथीही आज फेमस झाली आहे. (प्रतिनिधी)