शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

देवरी : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप, दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे, ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी ...

देवरी : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप, दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे, ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी टक्कर खेळणारी मोकाट जनावरे देवरी शहरात नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले.

शहरातील चिचगड रोड, शेडेपार रोड आणि बाजार चौक रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. बसस्थानक परिसर, विश्रामगृह, तहसील, पंचायत समिती या भागात नागरिकांची दररोज वर्दळ असते. त्या ठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर, अंगावर चालून येण्याची भीती असते.

मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा त्रास होतो. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी नगरपंचायतकडे केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे.

........

जनावरांच्या मालकांवर कारवाई करा

देवरी शहराच्या रस्त्यावर मोकाट जनावरे बिनधास्तपणे फिरताना दिसतात. याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. वर्दळीच्या मार्गावर या जनावरांच्या ठिय्या राहत असल्याने अनेकदा अपघात सुद्धा घडले आहेत. मात्र या जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या मालकांचा शोध घेऊन नगर पंचायतने कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांनी नगर पंचायतकडे केली आहे.