शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 19, 2014 23:48 IST

ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत.

रावणवाडी : ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करण्यासाठी एसटीच्या बसेसचा वापर अधिक करतात. त्यामुळे बस थांब्याजवळ सतत नागरिकांची वर्दळ असते. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात अनेकांनी खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. या भागात खाद्य पदार्थ विकण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. हॉटेलपेक्षा खाद्य पदार्थ ठेल्यांवर स्वस्त मिळत असल्याने तेथे खाद्य पदार्थ खाणाऱ्यांची गर्दी असते. परंतु सर्व खाद्य पदार्थ उघड्यावर विकल्या जात असल्यामुळे त्यावर वाहनांची धूळ मोठ्या प्रमाणात साचत असते. वातावरणात आर्द्रता असल्याने त्या पदार्थांवर माशाही सतत घोंगावत असतात. या पदार्थांवर जाळी किंवा झाकन ठेवणे आवश्यक असते. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. परिणामी असे खाद्य पदार्थ सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ग्रामीण भागातील काही प्रमुख गावांमध्ये आरोग्य केंद्र, बँक, शाळा-महाविद्यालय, पशू वैद्यकीय रूग्णालय, महसूल विभागाचे कार्यालय, पोलीस ठाणे आदी शासकीय कार्यालये आहेत. नागरिक विविध कामासाठी तेथे ये-जा करतात. दुपारची वेळ झाली तर काहीतरी खाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो. पैशाअभावी हॉटेलचे चैन त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते टपरीवरील अशा खाद्य पदार्थांचा आधार घेतात. समोसा, कचोरी, पाणीपुरी, भेल आदी उघड्यावरील पदार्थ सेवन केले जातात. परंतु या पदार्थांना एकही टपरीचालक झाकून ठेवत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. ग्रामीण भागात सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांजवळ नेहमीच रूग्णांची गर्दी दिसून येते. यासाठी संबंधित प्रशासनाने काही नियम तयार करून त्यांचे काटेकोरपणे पालन करायला लावणे, उघड्यावरील खाद्य पदार्थांचे नमूणे वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. परंतु संबंधित प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा विक्रेत्यांचे फावत आहे. (वार्ताहर)