शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पटांगण वाचविण्यासाठी नागरिकांचा मोर्चा

By admin | Updated: September 2, 2015 01:59 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर महसूल विभागातर्फे शासकीय गोडाऊनसाठी

देवरी : शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर महसूल विभागातर्फे शासकीय गोडाऊनसाठी बांधण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीच्या विरोधात मैदान बचाव कृती समितीने मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मंगळवारी दि. १ स्टेंबर रोजी प्राथमिक शाळेच्या मैदानावरुन शहराच्या प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन दिवून बांधकाम बंद करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात केलेल्या मागणीनुसार, शाळेच्या पटांगणाजवळ असलेल्या गोडावून जवळील अर्धे मैदानात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अर्धे मैदान संपुष्टात येणार असून त्यामुळे शासकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, तहसील कमेटीचे कार्यक्रम, सांस्कृतीक कार्यक्रम तसेच गणपती, शारदोत्साव, शालेय स्पर्धा, क्रिकेट टुर्नांमेट, लग्न समारंभ, राजकिय सभा करीता अडथळा निर्माण होईल करीता सुरक्षा भिंतीचे काम त्वरीत बंद करण्यात यावे. तसेच तसेच नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजुला लेंथ देवून ग्रामीण रुग्णालयाचा मुख्य मार्ग मोकळा करण्यात यावा. या दोन्ही प्रमुख मागण्याकरीता आज शाळकरी मुले व गावकऱ्यांनी लाक्षणिक आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण दहीकर, जुबीन खान, माजीद खान, विनोद अग्रवाल, असलम खान, पोकेश मुलतानी, मुकेश खंडेलवार, रवी काळे, दिवाकर शेंद्रे, जाकीरभाई, राहुल मोहबीया यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. माजी महिला बालकल्याण सभापती सवीता पुराम यांनी उपोषण स्थळाला भेट देवून देवरीवासीयांच्या मागणी संबंधात तहसीलदारांशी चर्चा करुन त्वरीत बांधकाम बंद करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)