शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यप्रणालीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

नवेगावबांध : नियमाप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार प्रकरणाची कामे प्रकरण कार्यालयात दिल्यानंतर २० ते २५ दिवसांत करणे बंधनकारक असते; ...

नवेगावबांध : नियमाप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार प्रकरणाची कामे प्रकरण कार्यालयात दिल्यानंतर २० ते २५ दिवसांत करणे बंधनकारक असते; परंतु अर्जुनी-मोरगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून नियमाला तिलांजली दिली जात आहे. तीन ते चार महिने लोटूनही येथील फेरफार आणि आखीव पत्रिकेची कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मालमत्तेसंबंधी कामे भूमी अभिलेख कार्यालयाकडे असतात. पूर्वी फेरफार किंवा आखीव पत्रिकेचे काम हे हस्तलिखित पद्धतीने करण्यात येत होते; परंतु आता ही कामे ऑनलाइन पद्धतीने होतात. ऑनलाइन प्रणाली नव्याने सुरू झाल्यानंतर यामध्ये काही अडचणी येत होत्या; परंतु त्यानंतर ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करण्यात आली. जेव्हा काम होण्यास सुरुवात झाली तेव्हा येथील कार्यालयातील फेरफाराची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली झाली. परिणामी ही कामे ठप्प पडली आहेत. त्यांच्या ठिकाणी जे नवीन कर्मचारी रुजू होणार होते, ते ३१ ऑगस्टला कामावर रुजू झाले. १ सप्टेंबरपासून ते १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत; त्यामुळे नागरिकांची कामे पुन्हा खोळंबली आहेत. या संदर्भात येथील प्रभारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

..............

वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल?

या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मी तीन महिन्यांपूर्वी आखीव पत्रिकेसाठी भूमी अभिलेख कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे अर्ज सादर केला होता. ते काम अजूनपर्यंत झालेलेच नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास ते समाधानकारक उत्तर देत नाहीत.

- बुद्धानंद लाडे, अर्जुनी मोरगाव