शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कचरागाडीसाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: July 5, 2017 00:39 IST

नगर पंचायत अंतर्गत रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे या कचऱ्याला कंटाळून येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिन्याभरापासून रस्त्यावर कचरालोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नगर पंचायत अंतर्गत रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे या कचऱ्याला कंटाळून येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सडक-अर्जुनी नगर पंचायतला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु अजूनपर्यंत शहरामध्ये कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील दोन वर्षापासून सर्व महिला आपली समस्या नगराध्यक्षांंना सांगून थकल्या आहेत. पण यावर कुणीही लक्ष देत नाही. फक्त कारणे सांगून मोकळे होतात. ही समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सडक-अर्जुनीचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्यात मतभेद आहेत. याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कचरा महिलांसाठी गंभीर समस्या झाली आहे. या कचऱ्यामुळे एकमेकांच्या घरासमोर कचरा टाकल्यावरुन महिलांची भांडणे होत आहेत. कचऱ्यामुळे डास, साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांतील मलमा २५ दिवसांपासून रस्त्यावर पडला असल्यामुळे लोकांना ये-जा करण्याकरिता खूप त्रास होत आहे. शासन स्वच्छता मोहीम राबवितो. परंतु भाजपचे वर्चस्व असलेल्या सडक-अर्जुनीत अस्वच्छतेने लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सडक-अर्जुनी येथे कचरागाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रत पालकमंत्री राजकुमार बडोले, नगराध्यक्ष, सभापती स्वच्छता नगर पंचायत कार्यालय सडक-अर्जुनी, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आहे.