शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श ग्राम’साठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: May 24, 2015 01:41 IST

आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी ...

भंडारा : आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी गावातील लोकांचा संपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले. सांसद आदर्श ग्राम योजनेची गाव विकास आराखडा कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक ए.आर. शेख उपस्थित होते. या गावात भौतिक सुविधांसोबतच गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा. गावात अन्नधान्य वितरण करण्यासाठी बायोमेट्रीक पध्दती सुरु करावी. त्यासाठी गावात बायोमेट्रीक मशिन देण्यात येईल. गावातील सर्व कुटुंबांचे रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. गावात सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच लोकांचे बँकेत खाते उघडून पंतप्रधान विमा योजनेचा लाभ गावातील लोकांना दयावा. यासाठी बँकेने गावात कॅम्प आयोजित करावा. गावातील १४ कुपोषित मुले कशामुळे कुपोषित आहेत याची कारणे शोधून मुलांवर तातडीने उपाय योजना करावी, गावातील प्रत्येक व्यक्तीचे हेल्थ कार्ड तयार करावे,असे निर्देश त्यांनी दिलेत.गावातील ११४ कुटुंबांना वीज जोडणी नाही. यासाठी वीज वितरण कंपनीने गावात कॅम्प घेवून सर्वांचे अर्ज भरुन घ्यावेत आणि वीज जोडणी करुन दयावी. कंपोस्ट खत प्रकल्प आणि शोष खड्डे तयार करुन गावात स्वच्छता राखली जाईल यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी. अंगणवाडी आणि शाळेमध्ये शौचालय आणि पाण्याची व्यवस्था असावी. तसेच सर्व कुटुंबियांकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, चार्ज आॅफिसर तथा तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुचळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)