शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

चुलोद रस्ता ठिकठिकाणी उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वेचौकीवर रेल्वेगाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांना चौकावर ...

हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा

गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वेचौकीवर रेल्वेगाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांना चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. आता पुलाला मंजुरी मिळाली आहे, मात्र लवकर काम करण्याची मागणी आहे.

कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष

केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकात कचरापेट्या ठेवण्यात आल्या. मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. ग्रामीण मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून ग्रामीणांची लूट केली जाते.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.

बाजारात वीजव्यवस्थेची मागणी

सडक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. तसेच येथील वॉर्ड क्रमांक ३ सर्व जनता याच मार्गावरून ये-जा करीत असते.

दुसरा हंगाम आला तरी बोनस मिळेना

इसापूर : अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. आता यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

दिवसाही सुरू असतात पथदिवे

गोंदिया : नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

निराधारांचे अनुदान त्वरित द्या

शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील तीन-चार महिन्यापासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता?

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी गावाच्या मध्य भागातून रस्ता असल्याने येथे वर्दळ असून धोका वाढला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.

शहरातील मजुरांच्या हाताला काम केव्हा...

अर्जुनी मोरगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोची काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनामुळे खेळाडूंचे भविष्य अंधारात

देवरी : शासनाने आदेश काढून बंदी हटविली आहे. मात्र याला क्रीडाक्षेत्र स्पर्धांसाठी तसेच मैदानावरील सरावासाठी अद्याप क्रीडा विभागाने कोणताही आदेश काढला नसल्याने खेळाडूंचे भविष्य अंधारात आहे.