शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या हक्कासाठी आंदोलन छेडणार- चित्रा वाघ

By admin | Updated: September 11, 2015 02:09 IST

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महिलांवरील अन्याय-अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर चालत आहे.

गोंदिया : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महिलांवरील अन्याय-अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर चालत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी रस्त्यावर उतरून महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठक नुकतीच पार पडली. त्यात ते महिला कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. बैठकीत आ. राजेंद्र जैन म्हणाले की, राज्यात सत्ताधारी भाजपा सरकार महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यात अपयशी ठरली आहे. ही परिस्थिती विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली असून आम्ही सरकारच्या विरोधात संघर्षपूर्ण आंदोलन करणार, असे ते म्हणाले. आपल्या मार्गदर्शनात वाघ पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात महिलांच्या हक्कासाठी आमची आघाडी काम करीत आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटादरम्यानच्या महिला व युवती आमच्या पक्षापासून दूर असल्याचे लक्षात येताच खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटन तयार करण्यात आले. देशातील युवतीसाठी संघटन तयार करणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महिला आघाडीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबतच युवती व महिलांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, याकडेही लक्ष असल्याने ते म्हणाले. यावेळी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, नागपूरच्या जिल्हाध्यक्ष दिप्ती काळमेघ, नगरसेविका प्रगती पाटील, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, गोंदिया शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, बँक संचालक प्रिया हरिणखेडे, तिरोडा पं.स. सभापती उषा किंदरले, जि.प. सदस्य वीणा बिसेन, खुशबू टेंभरे, ललिता चौरागडे, उपाध्यक्ष ममता बैस, अर्चना जायस्वाल, शाहीन मिर्जा, रजनी गौतम, सुनिता मडावी, प्रीती रामटेके, अनिता तुरकर, निता रहांगडाले, शालू पंधरे, शीला अंबुले, राखी ठाकरे, अनिता जैन, आशा पिल्लारे, कुंदा चंद्रिकापुरे, चेतना पटले, कुंदा भाष्कर, कुंदा दोनोडे, पुष्पा बोपचे, सरपंच वडगाये व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन लता रहांगडाले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)