आई बचावली : नवाटोल्यातील घटलासडक अर्जुनी : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवाटोला (रेंगेपार) येथील खेमराज छबीलाल बहेकार (३५) याने मुलाच्या मृत्युमुळे हताश होऊन स्वत: विष प्राशन करुन आत्महत्या केली. यावेळी खेमराजची पत्नी प्रमिला हिनेही विष घेतले. मात्र ती बचावली.सविस्तर वृत्त असे की, मुलगा अमरदीप खेमराज बहेकार (१३) हा १८ मे रोजी कोदामेडी गावाजवळील घोगराघाट येथे आंघोळीला गेला. नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे अमरदीपचा डोहात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे वडील खेमराज व त्याची लहान आई प्रमिला यांनी दुसऱ्या दिवशी (दि.१९) विष प्राशन करुन जीवन यात्रा संपवण्याचा बेत केला. खेमराज यांना दोन पत्नी आहेत. मोठी पत्नी धनवंता (३०) व लहान पत्नी प्रमिला (२६) या नांदत होत्या. खेमराजची मोठी पत्नी व दोन मुले हे सडक अर्जुनी येथे राहत आहेत. तर खेमराज व लहान पत्नी प्रमिलासोबत रेंगेपार ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नवाटोला या गावी राहत होते. प्रमिलाला मुलबाळ झाले नाहीत. मोठ्या पत्नीचा मुलगा अमरदीप याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने लहान पत्नी व वडील खेमराजच्या मनावर परिणाम झाला. त्यातच त्यांनी विषय घेतले. खेमराजचा गोंदिया येथे ग्णालयामध्ये मृत्यू झाला. तर प्रमिला मृत्यूशी झूंज देत आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
मुलाच्या मृत्यूमुळे ेवडिलाची आत्महत्या
By admin | Updated: May 23, 2015 01:44 IST