शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलाचा अखेर मृतदेहच आढळला

By admin | Updated: March 21, 2017 00:55 IST

आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील पुजारीटोला धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळीसाठी गेलेला उदय इंद्रदेव सोनटक्के (१२) हा मुलगा शनिवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

कालव्यात वाहून जलसमाधीगोंदिया : आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील पुजारीटोला धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळीसाठी गेलेला उदय इंद्रदेव सोनटक्के (१२) हा मुलगा शनिवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा मृतदेह रविवारी, १९ मार्चला सकाळी ७ वाजता शोधकार्यादरम्यान आढळला.कुंभारटोली येथून पुजारीटोला प्रकल्पाचा मुख्य कालवा गेलेला असून उन्हाळी धानपिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उदय मित्रांसह गेला होता. आंघोळ करीत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून नागरिकांची बचावासाठी मदत घेतली. मात्र नागरिक बचावासाठी पोहोचण्यापूर्वीच उदय वाहून गेला होता.शनिवारी उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता. शोधकार्यासाठी कालव्याचे पाणीदेखील बंद करण्यात आले होते. पाणी कमी होताच १९ मार्चला सकाळी तहसीलदार साहेबराव राठोड यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार पवार, मंडळ अधिकारी जी.टी. कठाणे, तलाठी पटले, पोलीस पाटील नर्मदा चुटे, कोतवाल रमेश कुंभरे व गावकऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान वाहून गेलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर उदयचा मृतदेह आढळला. पोलिसांना पाचारण करून पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. उदयच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली. आहे. सध्या अनेक कालव्यांना उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडल्यामुळे त्यात आंघोळीचा मोह मुलांना आवरत नाही. परंतू तो जीवघेणा ठरत आहे. (प्रतिनिधी)