शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 11, 2016 01:37 IST

एकेकाळी हिवाळ्याची चाहूल लागताच पारंपरिक मैदानी खेळ रंगायचे. परंतु २१ व्या शतकातील संगणक

मैदानी खेळाचा अभाव : अतिक्रमणाच्या सपाट्यामुळे पटांगणेही लुप्तरावणवाडी : एकेकाळी हिवाळ्याची चाहूल लागताच पारंपरिक मैदानी खेळ रंगायचे. परंतु २१ व्या शतकातील संगणक युगामुळे ग्रामीण भागातील मुलांचे पारंपरिक मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यापैकी पुरातन खेळांची माहिती आजच्या बच्चे कंपनीला नसल्याचे चित्र आहे. परिणामी मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हा परिषद शाळालगत मोठमोठे मैदानी खेळ खेळण्यासाठी पटांगणे असायचे. मात्र या पटांगणावर चहूबाजुंनी अतिक्रमण झाल्यामुळे ही पटांगणे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ही पटांगणे मोकळे करुन देण्याकरिता कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे मैदानी खेळांचे अस्तित्व सद्यस्थितीत धोक्यात आले आहे. पटांगणाअभावी डिजिटल युगामुळे संगणक, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम आदी खेळाकडे मुलांचा कल वाढला आहे. यासाठी शाळा परिसरात अपुरी मैदानेही कारणीभूत ठरत आहेत.गावात पटांगणाअभावी दिवसभर मुले मोबाईलवरील गेम, टीव्हीवरील कार्टुन पाहण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराच्या दुष्परिणामामुळे बालपणापासूनच अनेक प्रकारच्या व्याधींना समोर जावे लागत असून सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होत आहे. याशिवाय शारीरिक, मानसिक आरोग्यावरही मोठ्याने परिणाम जाणवत आहेत. त्याबाबदचे आकडेही प्रशासनासमक्ष नोंद असूनसुद्धा बघ्याची भूमिका निभावण्यात येत आहे. अनेक शाळा परिसरातील पटांगणे अतिक्रमणाचा सपाट्यामुळे गिळकृंत झालेली आहेत. मात्र अशा प्रकारावर कुठेही कारवाई प्रशासनाने केली असल्याची माहिती ऐकीवातसुद्धा नाही. त्यात शाळा प्रशासनाचेही पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शाळा परिसरातील पटांगणे लुप्त होण्याच्या मार्गावर असून मैदानी खेळांपासून मुलांसोबतच युवा वर्गासही खेळांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने क्रीडांगणावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्याची गरज आहे.मैदानी खेळाअभावी बालपणापासूनच पालकांना पाल्याच्या आरोग्यविषयक अतिरिक्त आर्थिक खर्चही करणे भाग पडत असून शाळा परिसरातील पटांगणे मोकळे कधी होणार, याची आतुरतेने वाट बघत आहेत. (वार्ताहर)