शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सात तालुक्यात बालकांचे कल्याण वाऱ्यावर

By admin | Updated: July 2, 2016 01:55 IST

बालकांची काळजी घेण्यासाठी तसेच कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येक तालुक्यात महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले.

‘सीडीपीओ’ प्रभारी : वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांकडे वर्ग दोनचा प्रभार नरेश रहिले गोंदियाबालकांची काळजी घेण्यासाठी तसेच कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येक तालुक्यात महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु गोंदिया जिल्ह्यात सात तालुक्यात मागील चार वर्षापासून कायमस्वरूपी महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने त्या अधिकाऱ्यांचा कारभार वर्ग तीनचे कर्मचारी म्हणजे आंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात एकच कायमस्वरूपी प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. त्यांना सोडले तर जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पद प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. देवरी येथे तुषार पौनीकर हे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सन २०१३ मध्ये दोन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी सेवानिवृत्त झाले व उर्वरीत ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांच्याठिकाणी शासनाने नविन अधिकाऱ्यांना पाठविण्यात अलो नाही. परिणामी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारीचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्यात आला. महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पद वर्ग २ ब चे पद आहे. परंतु अधिकारी उपलब्ध नसल्याने तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी आंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावरच या कामाच प्रभार दिला आहे. आमगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका रंजना गौर, सालेकसाचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका ललीता शहारे, सडक-अर्जुनीचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका एस.एस. बागडे, अर्जुनी-मोरगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीकाउषा आगाशे, गोरेगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका अवनिता श्रीवास्तव, गोंदिया १ चा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीकाअनिता भुसावळकर, गोंदिया २ चा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका अंजली बावणकर तर तिरोडा प्रभार सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी अंजना ढोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाचा संपुर्ण विभागाचा कारभार प्रभाऱ्यांच्या खांद्यावर आहे. आमगाव व अर्जुनी-मोरगाव येथील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. परंतु इतर ठिकाणचे पद बदलीमुळे रिक्त झाले होते. त्यांच्या कामाचे मुल्यामापन होणारमहिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पद सांभाळणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी २०१३ पासून आतापर्यंत काम सांभाळले. सध्याही त्या काम करीतच आहेत. परंतु अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे न्यायालयात टाकण्यात आलेल्या याचिका क्र.५९२० चा निकाल ४ एप्रिल २०१६ रोजी आला. त्या आंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या कामाचे मुल्यमापन करावे, त्यांच्या कामाचे अनुभव घेऊन पुरेशे कारण दाखविल्याशिवाय त्यांना त्या पदावरून हटविता येणार नाही. मूल्यमापनात उत्तम अनूभव आढळला नाही तर त्यांना पदावनत व्हावे लागेल. सहायक बीडीओंकडे प्रभार सोपविण्याचे आदेशशासनाने सन २०१२ मध्ये सहाय्यक खंडविकास अधिकारी हे पद निर्माण करून त्यांच्यावर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी या पदाचा कारभार सोपविण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया जिल्ह्यात सहाय्यक खंडविकास अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून वर्ग तीन च्या आंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. वर्ग २ ब च्या अधिकारी पदाची जबाबदारी वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांवरही गोंदिया जिल्ह्यात सोपविली जाते.