शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही राबताहेत बाल श्रमिक

By admin | Updated: May 13, 2014 23:41 IST

बाल श्रमिक उद्योजकांच्या शोषणाचे नेहमीच बळी ठरत आहेत. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. केंद्र शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी कायदा तयार केला आहे.

ंगोंदिया : बाल श्रमिक उद्योजकांच्या शोषणाचे नेहमीच बळी ठरत आहेत. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. केंद्र शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी कायदा तयार केला आहे. १४ वर्षांंंपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना काम करताना पहिल्यांदा पकडल्या गेल्यास त्यांना कामावर ठेवणार्‍यांना तीन महिन्यांची शिक्षा व एक लाख रुपये दंड तसेच दुसर्‍यांदा पकडल्या गेल्यास दोन वर्षांंंची शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यात अनेक प्रकारचे धोकादायक उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या उद्योगात बाल श्रमिक अधिक संख्येत काम करीत आहेत. १४ वर्षांंंपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून धोकादायक उद्योगात काम करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले असतानासुद्धा शेकडो मुले या क्षेत्रात कार्यरत आहेत.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पितळाचे भांडे तयार करण्याचे कारखाने, बिडी कारखाने, पोहामिल, राईस मिल, प्लास्टिक व अगरबत्ती उद्योग, होजियरी कारखाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चहाटपरी आदी ठिकाणी ही मुले हमखास पाहावयास मिळतात. ज्यांच्या हातात पेन व पाठीवर स्कूल बॅग असायला पाहिजे, त्यांच्या हातात उद्योगात काम करण्याचे साहित्य पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील दारिद्रय़ व गरिबीमुळे पोटाची आग शमविण्यासाठी ही मुले एकीकडे हजारोंच्या संख्येत या उद्योगात आपले लहानपण विसरले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदलासुद्धा मिळत नाही. त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचे कुशल व कलात्मक कार्य होत नसल्याने भविष्यात ते काहीच करू शकत नाही. १२ तासांपेक्षा अधिक काम केल्यानंतर या बालमजुरांना प्रदूषित वातावरण, प्रकाशाची कमी व अस्वस्थता मिळते.

गोंदिया जिल्ह्यात सर्वेक्षण अहवालानुसार नाममात्र बालकामगार कार्यरत असल्याचे शासनाच्या लेखी असले तरी प्रत्यक्षात ही गोष्ट पचनी पडत नाही. शासकीय अहवालात अशा प्रकारचे चमत्कार होणे स्वाभाविक आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या धोकादायक उद्योगातून बाल श्रमिकांना मुक्त करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. श्रम व कल्याण मंत्रालयाच्या वतीने या बाल श्रमिकांसाठी शिक्षणाची आधुनिक सोय करणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशाच्या भविष्यापोटी मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.

बालकामगारांचे पुनर्वसन व त्यांना सोईसुविधा देण्यासंदर्भात शासनाने कायदा केला असताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोईसवलती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कामगार काम करतात, त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनासुद्धा कामाला लावले जाते. मात्र, त्याचा मोबदला हा अत्यल्प असतो.

आर्थिक परिस्थितीमुळे कामगार कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टीचे परिणाम न पाहता उद्योग व्यवसायात आपल्या मुलांना काम करण्यास आडकाठी करीत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)