शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजारोहणाला मुख्य व प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित

By admin | Updated: August 16, 2014 23:34 IST

ध्वजारोहणाच्या नियोजित वेळेत मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी न पोहचल्याने अध्यक्षांनी त्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण उरकून टाकले. येथील नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाच्या

गोंदिया : ध्वजारोहणाच्या नियोजित वेळेत मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी न पोहचल्याने अध्यक्षांनी त्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण उरकून टाकले. येथील नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनी हा प्रकार घडला. त्यानंतर काही वेळाने दोघे अधिकारी पोहचले व उर्वरित कार्यक्रमात सहभागी झाले. दरवर्षी प्रमाणे नगर परिषदेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. नगराध्यक्षांच्या हस्ते नगर परिषदेत ध्वजारोहण करण्यात येते. या कार्यक्रमाला मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती गरजेची असते. मात्र अग्निशमन विभागातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या शर्टाला खोचा लागल्याने ते शर्ट बदलण्यासाठी घरी गेले. यावेळी त्यांच्या सोबत प्रशासकीय अधिकारी राणे होते. अग्निशमन विभागातील ध्वजारोहणानंतर लगेच नगर परिषदेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. मात्र फाटलेला शर्ट बदलण्यासाठी मुख्याधिकारी मोरे घरी गेल्याने त्यांना उशीर झाला. परिणामी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकून टाकला. तर मोरे यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी राणे हे सुद्धा असल्याने ते ही ध्वजारोहणाला उपस्थित नव्हते. ध्वजारोहण आटोपल्या नंतर दोघे अधिकारी पोहचले व कार्यक्रमात सहभागी झाले. हा विषय मात्र नगर परिषदेत सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (शहर प्रतिनिधी)