शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

छेडखानीचा गुन्हा पाठविला तडजोडीसाठी

By admin | Updated: August 24, 2015 01:44 IST

तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे.

सालेकसा पोलिसांवर प्रश्नचिन्ह : आरोपी तंटामुक्त अध्यक्षाकडेच प्रकरण तडजोडीसाठीगोंदिया : तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे. छेडखानीच्या प्रकरणाने वाढून हे रूप घेतल्याचे वास्तव आता पुढे येत आहे. छेडखानीसारख्या गंभीर गुन्ह्याला तंटामुक्त समितीकडे तडजोडीसाठी पाठविण्यात आल्याने ही घटना घडून एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी सन २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राज्यशासनाने अंमलात आणली. अनेक गावात उदभवणाऱ्या वादावर नियंत्रण या तंटामुक्त मोहीमेने आणले. परंतु गंभीर गुन्हे तंटामुक्त समितीला सोडवता येणार नाही ते गुन्हे न्यायालयातच चालतील असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या गंभीर गुन्ह्यात तक्रार नोंदवून न घेता तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडवून घेण्याचा सल्ला दिला.तंटामुक्त समितीला अदखलपात्र व क्षुल्लक वाद आपसी समझोत्यातून सोडविण्यास शासनाने संमती दिली. मात्र सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या या गंभीर गुन्ह्याला क्षुल्लक समजून ज्याने छेड काढली त्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडेच ते प्रकरण तडजोडीसाठी पाठविले. ज्याच्यावर छेडखानीचा आरोप आहे त्याच्याच समितीत ते प्रकरण तडजोड करताना तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा. आता काही करणार नाही, तिला काही झाल्यास मी जबाबदार राहील असे शंभर रूपयाच्या मुद्रांकावर त्याने लिहून दिले. परंतु प्रकरण तडजोड झाल्यानंतरही कुणी माझे काय बिघडवले असा ओरडत तो आरोपी गावात फिरत असे, असे मुलीचे मामा अनिल वानखेडे म्हणतात. पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवून कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र हलगर्जीपणा करण्यात आला व त्या निष्पाप तरूणीचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद का केली?आरती बारसे हिला जाळून तिचा मृतदेह विहिरीत टाकला गेला. सुरूवातीला पोलिसांना साक्षीदार मिळाले नसावे मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा खून असल्याचे सहज कळू शकत होते. आरोपी कोण व घटना कशी झाली या नंतरच्या बाबी होत्या. परंतु जळालेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळतो, ओढणी टेबलावर असते, रॉकेलची डबकी तिथेच पडून होती. असे अनेक पुरावे तेथेच होते तर पोलिसांनी त्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद का? असे बोलले जात आहे.