शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया शहरातील २२ फिक्स पाइंटमुळे रोखली ‘चैन स्नॅचिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

नरेश रहिले गोंदिया : वाटसरू किंवा फिरायला जाणाऱ्या महिलांचे दागिने ओढून घेऊन जाऊ नये, म्हणून गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी मागील ...

नरेश रहिले

गोंदिया : वाटसरू किंवा फिरायला जाणाऱ्या महिलांचे दागिने ओढून घेऊन जाऊ नये, म्हणून गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी मागील पाच ते सात वर्षांत ज्या ठिकाणी चैन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा, जबरी चोरीच्या घटना घडल्या, अशी गोंदिया शहरातील २२ ठिकाणे शोधून काढली. या ठिकाणांवर फिक्स पाइंट बसवून त्या ठिकाणी २४ तास पोलिसांचा बंदोबस्त नेमला. त्यामुळे सन २०२१ या वर्षात चैन स्नॅचिंगच्या एकही घटना घडल्या नाहीत, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.

गोंदिया शहर रामनगर, गोंदिया शहर व गोंदिया या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. गोंदिया शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सन २०१९ मध्ये १ व २०२० मध्ये १ असे गुन्हे घडले आहेत, परंतु या घटनांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पाच-सात वर्षांत २२ ठिकाणे घरफोडी, दरोडा, जबरी चोरी यांसारखे मालमत्ताविषयीचे वारंवार गुन्हे घडत असलेल्या भागात २२ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी नियमितपणे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. अशाच प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे घडत असलेल्या भागात ठिकाण निश्चित करून, त्या ठिकाणी नियमितपणे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सतत पोलीस अंमलदार डयुटीवर नेमण्यात येत आहेत. गोंदिया शहरात मार्शल पेट्रोलिंग, क्रमांक ११२ मोबाइल व्हॅन, पोलीस स्टेशनकडून पेंट्रोलिंग सतत ठेवण्यात येत आहे. या घटनांवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. महिलांच्या मनातही कोणतीही भीती नसून ते निर्भयपणे आपली नियमित दिनचर्या पार पाडीत आहेत. यामुळे सन २०२१ मध्ये आतापर्यंत चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला नाही.

................

कोट

गोंदिया शहराच्या २२ ठिकाणी फिक्स पाइंट तयार केले आहे. या फिक्स पाइंटवर २४ तास पोलिसांचा बंदोबस्त असतो. मागील घडलेल्या घटनांचा अभ्यास करून, हे कार्य केल्यामुळे सन २०२१ या वर्षात आतापर्यंत चैन स्नॅचिंगची एकही घटना घडली नाही. नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्यासाठी गोंदिया पोलीस सज्ज आहे.

- विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया.