शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही.

ठळक मुद्देकुणीही या काहीही करा : सुरक्षा रक्षकांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गॅस कटरने एटीएम फोडल्याच्या घटना घडत असून यातून एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँक व्यवस्थापनाला दिले होते. मात्र या आदेशाची सुद्धा सर्रासपणे पायमल्ली केली जात असून गोंदिया शहर व जिल्ह्यातील बहुतांश एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचाच वॉच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे.कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून एटीएम देखील सुरक्षीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापल्याची घटना घडली. या घटनेनंतर एटीएम व एटीएममधून पैसे काढणे किती असुरक्षीत आहे याची प्रचिती शहरातील काही एटीएमला भेट देवून पाहणी केल्यानंतर निदर्शनास आली. शहरातील एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता बहुतेक एटीएम मध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले.शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटिव्हीच्या निगरानीत असल्याचे आढळले. एटीएम शहरातील मुख्य परिसरात असल्याने त्यांना फोडण्या सारख्या घटना घडणे तेवढेही शक्य नसल्याचे दिसले. मात्र बँक आॅफ महाराष्ट्रचे दुर्गा चौकातील दुर्गा मंदिराच्या बाजूला असलेले एटीएम सुरक्षेच्या निकषांत बसत नसल्याचे दिसले.येथे गार्ड नसल्याने कुणीही या मशीन वापरा व निघून जा असे चित्र आहे. याशिवाय स्टेट बँकेच्या मुख्य शाखालगत असलेले एटीएम सुरक्षारक्षकाविनाच दिसले. बाजारातील एक्सीस बँक, इलाहाबाद बँक यांचेही एटीएम दिवसाच काय रात्रीलाही सुरक्षा रक्षकाविना असतात.अन्य बँकांना सीसीटीव्हीचाच आधारजिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयटीआयसीआय व एक्सीस बँकेच्या एटीएमला सीसीटिव्हीचाच आधार असल्याचे दिसून आले. बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटिव्ही लागलेले असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, एटीएम मशीन्सची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतानाच एटीएममध्ये गुन्हेगारीचे प्रकारही घडत आहेत. अशात एटीएम व ग्राहक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही हा एकमेव पर्याय किती सुरक्षीत आहे हा मात्र प्रश्न सर्वांना पडत आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही