शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही फुटेजमधून होणार मारहाणीचा उलगडा

By admin | Updated: April 5, 2017 01:00 IST

सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत असंवैधानिक भाषेवरुन उठलेल्या वादात शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांना मारहाण करण्यात आली.

जि.प. सभागृहातील प्रकार : सभापतीवर अ‍ॅट्रॉसिटीचा तर सहा सदस्यांवर मारहाणीचा गुन्हा गोंदिया : सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत असंवैधानिक भाषेवरुन उठलेल्या वादात शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांना मारहाण करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादीच्या सहा जि.प. सदस्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजुने परस्परांविरूद्ध तक्रारी केल्या असल्या तरी नेमका प्रकार काय घडला याची तपासणी सीसीटीव्ही फुटेजमधूनच केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा सुरु असताना या संदर्भात झालेल्या मारहाणीप्रकरणी शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांच्या उपस्थितीत जि.प.सदस्य कैलास पटले यांनी जि.प.च्या कारभाराबद्दल आक्षेपार्ह शब्दाप्रयोग केला. यावरुन पटले यांनी सभागृहाची माफी मागावी असे अध्यक्षांनी म्हटले. कसेबसे हे प्रकरण निवळत असताना जेवनानंतर पुन्हा माफीच्या मुद्द्यावरून वातावरण गरम झाले. विरोधकांनी बहिष्कार टाकत सभागृह सोडले. यावेळी सुनीता मडावी यांनी व्यासपीठावर चढून कॉडलेस माईक पी.जी.कटरे यांच्या अंगावर फेकून मारला असा त्यांच्यावर आरोप केला आहे. यावेळी काचेच्या ग्लासने मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अडवताना हाताला दुखापत झाली, असा आरोप कटरे यांनी केला आहे. या प्रकरणात जि.प.चे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले. विरोधी सदस्यांनी चिथावनी दिल्याने त्यांच्यावर भादंविच्या कलम ३२४, ३५५, ४२७, १०९, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे जि.प. सदस्य सुनीता सुधाकर मडावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या इमारती दुरुस्ती कामाबद्दल प्रशासकीय पत्राच्या झेरॉक्स कटरे यांना दाखवित ते परत घ्या, मला नाही पाहिजे, असे बोलले असता टेबलावर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास पी.जी.कटरे यांनी फेकून मारला. त्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली. इतकेच नव्हे तर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार मडावी यांनी केली आहे. त्यामुळे कटरेंविरुद्ध कलम ३२४ सहकलम ३ (१), ३(२), (५), (१), अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. चार कॅमेऱ्यांची तपासात मदत जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात ४ सी.सी. टीवी कॅमेरे लावण्यात आले आहेत. अध्यक्ष व सर्व सभापती ज्या मंचावर बसतात त्या ठिकाणी एक सी.सी.टीवी कॅमेरा व स्टेजच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १ तर मंचाच्या विरुद्ध बाजूला १ असे चार सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यामुळे सभागृहातील प्रत्येक हालचाली टिपल्या जातात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या कथित मारहाणीची सत्यता पोलीस तपासताना हे सी.सी. टीवी कॅमेरे मदत करणार आहेत.