शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगांवदेवी : कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्याकरिता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने सडक-अर्जुनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बोंडगांवदेवी : कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्याकरिता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने सडक-अर्जुनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मार्तंड खुणे यांच्या दालनात सोमवारी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी खुणे यांनी कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या बैठकीला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश मेंढे, पशुधन विकास अधिकारी एस. बी. वाघाये, सहाय्यक प्रशासन अधिकारी एच. व्ही. गौतम, विस्तार अधिकारी एच. टी. निमजे, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बागडे उपस्थित होते. यावेळी कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांची दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगान्वये अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आश्वासन प्रगती योजनेंतर्गत १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना १ जानेवारी २०१६पासून लागू करणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव तसेच सेवापुस्तिका सहावे व सातवे वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्री अंशराशीकरण राशी त्वरित देण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे उर्वरित सहावे व सातवे वेतन आयोगाचे व सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व उत्तीर्ण झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अविलंब, सेवानिवृत्ती फाईल्स त्वरित जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. खुणे यांनी महासंघाच्या समस्या व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे तालुकाध्यक्ष होमेंद्र शहारे, सुंदरलाल नंदेश्वर, व्ही. जे. मडावी, अनिल कसारे, ए. पी. गजभिये, के. पी. बंसोड, डी. के. उके, एल. डी. राऊत, एस. डी. राऊत, कर्मचारी के. टी. झिंगरे, के. डी. टेकाम, आर. व्ही. कुंभरे, आर. एस. हटेले, आर. एम. भोयर यांचा समावेश होता.

....

या मागण्यांवर केली चर्चा

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी-शिक्षक-अधिकाऱ्यांची सेवापुस्तिका काही कारणास्तव जिल्हा परिषदेत अडकली आहे. संबंधित विभागांना पत्र पाठवून त्वरित मागणी करण्यात यावी, त्यांचे मासिक वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे, बांधकाम विभागासह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची प्रवास भत्ता देयके नियमित काढण्यात यावी, सेवानिवृतांची पेन्शन तर कार्यरतांचे वेतन व मानधन नियमित करावे, अंगणवाडी सेविकांची प्रवास भत्ता देयके नियमित काढावी, सन २०११मध्ये जनगणनेचे कार्य करणाऱ्या शिक्षकांची नोंद, संगणक परीक्षा उत्तीर्ण नोंद, मराठी-हिंदी भाषा सूट संदर्भातील नोंद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.