ऑनलाईन लोकमतगोंदिया : पाल्याने दहावी, बारावी उर्तीण केल्यानंतर त्याला कोणत्या क्षेत्रात पाठवावे यावरुन पालकांमध्ये बराच संभ्रम असतो. ९० टक्के विद्यार्थी हे करिअरची निवड ही प्रभावित होवून जो व ट्रेंड सुरू आहे त्याकडे आकर्षीत होवून करतात. त्यामुळेच ते पुढे जाऊन त्यात त्यांना अपयश येते. करिअरची निवड करताना तुम्हाला कोणत्या क्षेत्रात रुची व त्याबद्दल आत्मविश्वास आहे त्याच क्षेत्राची निवड करा, करिअर हे फॅशन नव्हे तर पॅशन बनत असल्याचा सल्ला विद्यार्थ्यांना चाणक्य काऊन्सलिंगचे मुख्य मार्गदर्शक जगदीश अग्रवाल यांनी दिला.लोकमत बालविकास मंच व चाणक्य काऊन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२९) स्थानिक अग्रसेन भवन सभागृहात दहावीनंतर पुढे काय? या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून नो युवर टेंलेंटच्या व्यवस्थापक डॉ. रश्मी शुक्ला उपस्थित होते. याप्रसंगी नागपूर इव्हेंटचे अश्विन पतरंगे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजिका ज्योत्सना सहारे, जिल्हा जाहीरात प्रतिनिधी अतुल कडू, लघू जाहीरात प्रतिनिधी आशिक महिलावार उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या कल दोनच क्षेत्राकडे अधिक आहे. इंजिनिअरींग आणि मेडीकल क्षेत्राशिवाय दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात जावे यावरुन विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असून केवळ या दोनच क्षेत्रात करिअर असल्याचा त्यांचा समज आहे. मात्र दहावी बारावीनंतर पुढे काय यासाठी ५ हजार ६०० पर्याय आहेत. मात्र याचीच माहितीच पालक आणि विद्यार्थ्यांना नसल्याचे सांगितले. केवळ एखाद्याने एखादे क्षेत्र निवडले म्हणून आपण सुध्दा तेच क्षेत्र निवडण्याची गरज नाही. करिअरची निवड करताना तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आवड आहे, तुम्हाला त्याबद्दल कितपत आत्मविश्वास या गोष्टींचा आधी विचार करा. असे कराल तर तुम्हाला कधीच अपयश व पश्चाताप करावा लागणार नाही. कारण करिअर हे कुठल्याही क्षेत्रात होवू शकते. नागपूरच्या पोहा विकणाºयाची संपत्ती ४० कोटी व वर्ध्याच्या चिवडा तयार करुन विकणाºया आजीबाईची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. पोहे व चिवडा विक्री करणाºया आजीबाईचे करिअर चांगले होवू शकते तर मग तुमचे का होवू शकत नाही, असा सवाल त्यांनी विद्यार्थी व पालकांना केला. आपली मुल कोणत्या क्षेत्रातील जातील हे महत्त्वाचे नाही तर ते ज्या क्षेत्रात जातील त्यात चांगला परफार्मन्स देतील हे महत्त्वाचे आहे. मुलाची टक्केवारी नव्हे तर त्यांच्यातील स्कील ओळखून त्या क्षेत्रात पाठवा. तुम्ही ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी केवळ चांगली टक्केवारी असून काही होत नाही तर त्यासाठी आत्मविश्वास आणि ताकदीच्या प्रयत्नांची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो नेहमी मोठी स्वप्न पहा आणि ती प्रत्यक्षात उतविण्यासाठी परिश्रम घ्या. बडे सपनो की किंमत भी बडी होती है असे सांगत अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांमध्ये जोश भरला. या वेळी रश्मी शुक्ला यांनी सुध्दा करिअरची निवड करताना आपल्या पाल्यांची मानसिकता व रुची कशी ओळखायची त्यांच्यातील रुची कशी डेव्हलप करायची यावर पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांचे निरासन अग्रवाल व शुक्ला यांच्याकडून करुन घेतले.वर्षभरात ७३४ विद्यार्थ्यांच्या आत्महत्याकेवळ आकर्षण आणि पालकांच्या दबाबमुळे मनाविरुध्द करिअरची निवड केलेल्या ७३४ विद्यार्थ्यांनी त्यांना आलेल्या अपयशामुळे मागील वर्षभरात आत्महत्या केली. त्यामुळे पाल्यांवर करिअर व टक्केवारीसाठी आग्रह धरु नका, त्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे त्या क्षेत्रात करिअर करु द्या असे अग्रवाल यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनो सोशल मीडियापासून दूर रहाविद्यार्थ्यानो मोठ्या स्वप्नांची किंमत सुध्दा मोठी असते. त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. मात्र सध्या विद्यार्थ्यांचा कल हा मोबाईल आणि सोशल मीडियाकडे अधिक आहे. दिवसातील आठ ते दहा तास ते यासाठी खर्च करतात. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अभ्यासादरम्यान मोबाईल आणि फेसबुकपासून दूर राहण्याचा सल्ला अग्रवाल यांनी दिला.टक्केवारीसह व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचाचांगले करिअर घडविण्यासाठी केवळ भरपूर मार्क्स आणि टक्केवारी मिळणे पुरसे नाही तर व्यक्तीमत्व विकास देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण पुढील पाच सहा वर्षाने टक्केवारी नव्हे तर तुमच्या पर्सनॉलीटीबद्दल विचारले जाईल व तेच पाहून तुमची निवड केली जाईल. त्यामुळे टक्केवारीसह व्यक्तीमत्त्व विकास देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
करियर फॅशन नव्हे तर पॅशन बनते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:16 IST
पाल्याने दहावी, बारावी उर्तीण केल्यानंतर त्याला कोणत्या क्षेत्रात पाठवावे यावरुन पालकांमध्ये बराच संभ्रम असतो. ९० टक्के विद्यार्थी हे करिअरची निवड ही प्रभावित होवून जो व ट्रेंड सुरू आहे त्याकडे आकर्षीत होवून करतात.
करियर फॅशन नव्हे तर पॅशन बनते
ठळक मुद्देजगदीश अग्रवाल : बाल विकास मंचचा उपक्रमात दहावीनंतर पुढे काय? यावर मार्गदर्शन