शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार अपंगांना करणार सक्षम

By admin | Updated: July 16, 2016 02:09 IST

जिल्ह्यातील अपंगांसाठी राज्य शासनाने सर्वाधीक दोन कोटी मंजूर केले आहेत.

राजकुमार बडोले : पत्रपरिषदेत दिली माहिती गोंदिया : जिल्ह्यातील अपंगांसाठी राज्य शासनाने सर्वाधीक दोन कोटी मंजूर केले आहेत. येत्या ३० जुलै रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवनात अपंगांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एक हजार अपंगांना सक्षम बनविण्यासाठी उद्योगांकरीता कर्ज वितरण केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सामाजीक न्याय व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१५) पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथे आॅगस्ट महिन्यात महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगीतले. शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत नसून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हाधिकारी तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना कामावर लावले आहे. यात विधानसभा क्षेत्रातील ३६० गावांतील ४० हजार लोकांचे अर्ज भरविले जात आहे. यांतर्गत २४ जुलै रोजी सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात, २७ जुलै रोजी अर्जुनी-मोरगावच्या प्रसन्ना सभागृहात व ३० जुलै रोजी गोरेगाव यथे कॅम्प घेतले जाणार आहे. यासाठी तिन्ही तालुकास्थळांवरील तहसील कार्यालयात समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली असून येत्या ८ आॅगस्ट पर्यंत अर्ज कक्षात द्यावयाचे आहेत. राज्यात २० हजार प्रमाणपत्र तयार करून देण्याचे कार्य पूर्वी काही जिल्ह्यांत झाले आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४० हजार प्रमाणपत्र तयार करून देणे हा एक नवीन रेकॉर्ड असणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण या महासमाधान शिबिरात तयार करण्यात येणारे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. हे शिबिर पूर्वी १६ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या तारखेनुसार आता तारीख ठरवीली जाणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना पुरस्कृत केले जाणार असल्याचीही माहिती नामदार बडोले यांनी दिली.