शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार निघाले ‘डोअर टू डोअर’

By admin | Updated: December 25, 2016 02:00 IST

नगर परिषद निवडणुकीचा जोर आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात बघावे त्या भागात

आश्वासनांची उधळण : मतांसाठी मागतागेत जोगवा कपिल केकत गोंदिया नगर परिषद निवडणुकीचा जोर आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात बघावे त्या भागात उमेदवार आपल्या समर्थकांना घेऊन ‘डोअर टू डोअर’ जावून मतांचा जोगवा मागत आहेत. यासाठी त्यांच्याकडून मतदारांसोबत जुने नातेसंबंध जोडले जात असतानाच निवडून आल्यानंतर कामांच्या आश्वासनांची उधळण केली जात आहे. काहीही करून मते आपल्यालाच मिळावी यासाठी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत उमेदवार व त्यांच्या समर्थकांची हीच दिनचर्या सध्या बघावयास मिळत आहे. येत्या ८ जानेवारी रोजी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र सादर करावयाचा पहिला टप्पा १७ तारखेला पार पडला असून येत्या २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घ्यावयाचे आहेत. असे असले तरिही पक्षांनी घोषीत केलेले उमेदवार आतापासून आपल्या कामाला लागले आहेत. राजकीय पक्षातील उमेदवारांतील आपसातील फाईट तर आहेच शिवाय काही प्रभागात अपक्ष म्हणून अर्ज सादर करणारेही भारी असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यात शहरातील प्रभाग आता मोठे झाल्याने एवढ्या मोठ्या प्रभागात प्रत्येकाच्या घरी जावून त्यांची भेट घेणे गरजेचे झाले आहे. यामुळेच प्रत्येकच उमेदवार आता ‘डोअर टू डोअर’ भेटीवर जोर देत असून प्रभागातील प्रत्येकच मतदाराला गाठण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहचत आहेत. या भेटीत उमेदवारांकडून मतदारांसोबत जवळीक साधण्यासाठी जुने नातेसंबंध जोडले जात आहेत. शिवाय निवडून आल्यावर समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे आश्वासनही देत आहेत. सध्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांची हीच दिनचर्या बघावयास मिळत आहे. दिवस कमी व मतदारांची घरे जास्त असल्याने सकाळपासून रात्री उशीरापर्यंत हाच कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे शहरात बघावे त्या गल्लीत सध्या उमेदवार त्यांच्या समर्थकांची गर्दी बघावयास मिळत आहे. शिवाय अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या-त्या प्रभागातील उमेदवारांकडून सोबत घेत भेटी घेतल्या जात आहेत. यात रॅली काढून आपला जोर दाखविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. प्रचाराच्या या धामधूमीत मात्र शहरवासीयांना चांगलीच मजा येत आहे. पाच वर्षे मतदारांना फिरविणाऱ्यांना आता मतदाराच्या मागे फिरावे लागत असल्याचे बघून मतदारही खुश आहेत. होर्डिंग्स, पॉम्प्लेट व वाहनांतून प्रचार निवडणूक प्रचारासाठी नवनवीन माध्यमांचा वापर केला जात असतानाच प्रचारातील प्राथमिक व जुनी माध्यमेही मात्र त्याच प्रमाणात वापरली जात आहेत. यात होर्डींग्स, पॉम्प्लेट व वाहनांचा समावेश असून शहरात या सर्व प्रकारांचा चांगलाच वापर होत असताना दिसून येत आहे. परिणामी शहरातील प्र्रत्येकच भागात उमेदवारांचे होर्डींग्स लागले दिसून येत आहेत. शिवाय अध्यपक्षासाठी रिंगणात असलेल्यांकडून पॉम्प्लेटचा वापर केला जात आहे. तसेच प्रचारासाठी प्रत्येकच प्रभागात प्रचार वाहने दिसत आहेत. आता स्थानिक नेत्यांवर गाणे तयार करण्याची सुविधा असल्याने त्याचाही चांगलाच वापर केला जात आहे. सोशल मीडियाचा वापर प्रचाराचे एक माध्यम म्हणून सध्या फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपचा चांगलाच जोम आहे. कोणताही विषय असो फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यास लागलीच त्याची प्रसिद्धी होते व तोही नि:शुल्क. नेमका हाच फायदा घेत नगर परिषद निवडणुकीसाठीही सोशल मीडियाचा चांगलाच वापर केला जात आहे. आज फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप बघताच नगर परिषद निवडणुकीच्याच चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. समर्थकांकडून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे त्यांचेच फोटे दिसत आहेत. चिन्ह वाटपाआधीच अपक्षांचा प्रचार येत्या २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घ्यावयाचे असून त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहेत. परंतू अपक्ष निवडणूक लढणारे उमेदवार निवडणूक चिन्ह मिळालेले नसतानाही प्रचाराला लागले आहेत. त्यासाठी अनेकांनी पॉम्प्लेट्स सुद्धा छापले आहेत. केवळ चिन्हाची जागा रिकामी ठेवून बाकीचा मजकूर भरून हे उमेदवार आपली प्रचाराची हौस भागवत आहेत. मतदारांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. या भेटीतून आपली ओळख करून देण्याचे काम ते करीत आहेत. शिवाय चिन्ह मिळाल्यानंतर त्यांना फक्त एक उजळणी करावी लागणार आहे. हे ठरवून ते भेटीगाठीला लागले आहेत.